'How Many Hundreds at Lord's Ya?' जेव्हा अजित आगरकरने रिकी पॉन्टिंग ला केले ट्रोल, माजी भारतीय क्रिकेटरने सांगितला मजेदार प्रसंग
माजी गोलंदाज अजित आगरकरने 2002 मध्ये लॉर्ड्सवर 'क्रिकेटचा मक्का' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी सामन्यात शतक ठोकले आहे. याच संबंधी आगरकरने पॉन्टिंग विषयी एक गमतीशीर प्रसंग शेअर केला. आगरकरने लॉर्ड्समध्ये शतक ठोकण्याच्या नावाखाली ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पॉन्टिंगला कसे ट्रोल केले हे उघडकीस केले.
माजी गोलंदाज अजित आगरकर (Ajit Agarkar) याने भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये ठसा उमटविला. वनडेमध्ये त्याने भारताकडून (India) तिसऱ्या सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय फलंदाजीतही या माजी क्रिकेटपटूने विशेष कामगिरी केली आहे. आगरकरने 2002 मध्ये लॉर्ड्सवर 'क्रिकेटचा मक्का' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावर कसोटी सामन्यात शतक ठोकले आहे हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. आगरकरचे नाव लॉर्ड्स येथे शतक झळकावणाऱ्या आदरणीय बोर्डवर नोंदले गेले आहे. लॉर्ड्सवर शतक करणे क्रिकेट विश्वात सन्मानजनक मानले जात असताना ब्रायन लारा, रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting), सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, जॅक कॅलिस यासारख्या दिग्गज फलंदाजांना ही कामगिरी करण्यात यश आले नाही. याच मैदानावर आगरकरने टेस्ट कारकिर्दीतील पहिले आणि अंतिम कसोटी शतक ठोकले आहे. याच संबंधी आगरकरने पॉन्टिंग विषयी एक गमतीशीर प्रसंग शेअर केला. नुकत्याच झालेल्या व्हिडिओ पॉडकास्टमध्ये आगरकरने लॉर्ड्समध्ये शतक ठोकण्याच्या नावाखाली ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पॉन्टिंगला कसे ट्रोल केले हे उघडकीस केले. (सचिन तेंडुलकरला 100 शतक पूर्ण करू न दिल्याने मिळाली जीवे मारण्याची धमकी, 2011 टेस्ट मॅचचा इंग्लंड गोलंदाजाने सांगितला किस्सा)
गौरव कपूरसोबतच्या व्हिडिओ पॉडकास्टमध्ये आगरकर यांनी खुलासा केला की, "केकेआरमध्ये माझ्याबरोबर खेळत असताना मी एकेकाळी शांततापूर्ण पॉन्टिंगला ट्रोल केले. मी हसत त्याला विचारले, लॉर्ड्सवर किती शतकं केली?" आगरकर आणि पॉन्टिंगने 2008 आयपीएलमध्ये केकेआरचे प्रतिनिधित्व केले होते. आगरकर पुढे म्हणाले की, महान फलंदाजाशी केलेल्या कामगिरीची तुलना करणे त्याला थोडेसे अनादर वाटले. माजी गोलंदाज म्हणाला, "बघा पण, त्या खेळाडूंनी जे काही केले तरी माझे एक शतक त्याच्यासमोर काही नाही. त्यांना असा प्रश्न विचारण्यासाठी मला अपमानजनक वाटेल. पण ते मनोरंजनासाठी होते. लॉर्ड्समध्ये शतक झळकावण्यास भाग्यवान माझे भाग्य आहे. ती विशेष आठवण आहे."
आगरकरने 2002 लॉर्ड्स सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 568 धावांच्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना शतक ठोकले होते. आगरकर जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा भारताने 170 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. तथापि, त्याच्या शतकाचे श्रेय मोठ्या प्रमाणात आशिष नेहरालाही दिले जाते, यांच्यासमवेत त्याने दहाव्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. नेहराने एक टोका रोखून धैर्याने खेळ करून 19 धावा केल्या, यामुळे आगरकरला वेळ मिळाला आणि त्याने एकमेव कसोटी शतक झळकावले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)