KKR vs SRH T20 Stats In IPL: कोलकाता आणि हैदराबाद संघाची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी? येथे पाहा दोन्ही संघांची आकडेवारी
या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. कोलकाता तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, हैदराबाद संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळेल.
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 15 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) यांच्यात ईडन गार्डन्स, कोलकाता (Eden Gardens, Kolkata) येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या हंगामात, कोलकाताचे नेतृत्व अजिंक्य राहणे करत आहे. तर, हैदराबादची कमान पॅट कॅमिन्सच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. कोलकाता तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, हैदराबाद संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळेल.
हेड टू हेड रेकाॅर्ड (KKR vs SRH Head To Head)
आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एकूण 28 सामने खेळले गेले आहेत. या काळात, कोलकाता नाईट रायडर्सने वरचढ कामगिरी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने 19 सामने जिंकले आहेत. तर, सनरायझर्स हैदराबादने फक्त नऊ सामने जिंकले आहेत. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये तीन सामने खेळले गेले. कोलकाता नाईट रायडर्सने तिन्ही सामने जिंकले होते. सनरायझर्स हैदराबाद संघाने 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शेवटचा विजय नोंदवला होता. यावेळी सनरायझर्स हैदराबाद पुनरागमन करू इच्छिते.
कोलकाताच्या 'या' खेळाडूंनी हैदराबादविरुद्ध केला आहे कहर
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 20 डावात 25.16 च्या सरासरीने 478 धावा केल्या आहेत. या काळात अजिंक्य रहाणेने चार अर्धशतकेही झळकावली आहेत. अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त, स्फोटक सलामीवीर क्विंटन डी कॉकने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 33.58 च्या सरासरीने आणि 130.84 च्या स्ट्राईक रेटने 403 धावा केल्या आहेत. दरम्यान, क्विंटन डी कॉकच्या फलंदाजीतून तीन अर्धशतकी खेळीही झाल्या आहेत. गोलंदाजीत, आंद्रे रसेलने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 16.04 च्या सरासरीने 23 विकेट्स घेतल्या आहेत.
हैदराबादच्या 'या' खेळाडूंनी कोलकाताविरुद्ध केला आहे कहर
सध्याच्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा घातक सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध तीन डावात 150 च्या स्ट्राईक रेटने 75 धावा केल्या आहेत. दरम्यान, ट्रॅव्हिस हेडने 1 अर्धशतक झळकावले आहे. ट्रॅव्हिस हेड व्यतिरिक्त, स्फोटक अभिषेक शर्माची कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खराब कामगिरी झाली आहे. ट्रॅव्हिस हेडने या संघाविरुद्ध 9 डावात 124.53 च्या स्ट्राईक रेटने 132 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत, मोहम्मद शमीने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 14 सामन्यात 26.44 च्या सरासरीने आणि 7.83 च्या इकॉनॉमी रेटने 16 विकेट्स घेतल्या आहेत.
ईडन गार्डन स्टेडियमवर दोन्ही संघांची कामगिरी
कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडियमवर आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 10 सामने खेळले गेले आहेत. या काळात कोलकाता नाईट रायडर्स संघाने सात सामने जिंकले आहेत. तर, सनरायझर्स हैदराबादने फक्त तीन सामने जिंकले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने या मैदानावर एकूण 89 सामने खेळले आहेत. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सने 52 सामने जिंकले आहेत आणि केकेआरने 37 सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादने या मैदानावर 10 सामने खेळले आहेत. सनरायझर्स हैदराबादने तीन सामने जिंकले आहेत आणि सात सामने गमावले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2025 04:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

