मुंबईत परतलेल्या 'HitMan' रोहित शर्मा याला खराब पालकत्वासाठी Netizens ने सुनावले खडेबोल

या फोटो आणि व्हिडिओवर चाहते रोहितला प्रोत्साहन देत आहेत, त्याचे कौतुकही करत आहेत. दुरीकडे, नेटिझन्स त्याला लेक समयारसोबत निष्काळजी पणाने वागण्यासाठी खडेबोल सुनावले आहे.

रोहित शर्मा, पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरा (Photo Credit: Yogen Shah)

बुधवारी न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध झालेल्या आयसीसी (ICC) विश्वचषकच्या सेमीफायनलमधील पराभवाच्या नंतर भारतीय संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आपली पत्नी रितिका साजदेह (Ritika Sajdeh) आणि लेक समयार (Samaira) सह मुंबईत दाखल झाला. रोहित आणि कुटुंब टीमच्या दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी इंग्लंडहून (England) भारतात परतले. रोहितचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोजमध्ये रोहित एअरपोर्टवर बाहेर पडल्यावर स्वतः आपली एसयूव्ही गाडी चालवत घरी जायला निघाला. (टीम इंडिया ला मागे टाकत रोहित शर्मा, पत्नी रितिका आणि लेक समायरा सह मुबंईत परतला, पहा Photos)

या फोटो आणि व्हिडिओवर चाहते रोहितला प्रोत्साहन देत आहेत, त्याचे कौतुकही करत आहेत. दुरीकडे, नेटिझन्स त्याला लेक समयारसोबत निष्काळजी पणाने वागण्यासाठी खडेबोल सुनावले आहे. रोहितचा एअरपोर्टवरील फोटो आणि व्हिडिओ वायरल होताच नेटिझन्सनी त्याच्या गाडीत मुलीसाठी कन्व्हर्टिबल बेबी सीट न बसवण्यासाठी त्याची टीका केली आहे.

दरम्यान, विश्वचषकमधील पराभवानंतर रोहितने ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केलं. एक भावनात्मक ट्विट करत रोहित म्हणाला, "जेव्हा चांगली खेळण्याची गरज होती, तेव्हा आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. 30 मिनिटांच्या आमच्या खराब खेळीमुळं आम्हाला वर्ल्ड कप जिंकता आला नाही. माझे अंतकरण जड झालेआहे, खात्री आहे मला तुम्हालाही तसेच वाटत असेल. तरी, घरापासून लांब खेळत असतानाही चाहत्यांनी आम्हाला समर्थन केले. इंग्लंडमध्ये आम्हाला निळा रंग जास्त दिसत होता."