Harshit Rana (Photo Credit - X)

पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हर्षित राणाच्या नावावर एक खास विक्रम नोंदवण्यात आला. तो कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पहिला खेळाडू बनला आहे. चौथ्या टी-20 सामन्यात शिवम दुबेच्या जागी त्याला अचानक संघात समाविष्ट करण्यात आले. फलंदाजी करताना डोक्याला दुखापत झाल्यामुळे शिवम दुबे मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी येऊ शकला नाही. भारताच्या डावाच्या 11 व्या षटकात ड्रिंक्स ब्रेकनंतर हर्षित राणा (Harshit Rana) मैदानात आला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने लिव्हिंगस्टोनला आपला बळी बनवले. तो टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कन्कशन सबस्टीट्यूट म्हणून पदार्पण करणारा जगातील पहिला खेळाडू आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये असे यापूर्वी घडले आहे.

क्रिकेटमध्ये पदार्पण: कन्कशन पर्याय (पूर्ण सदस्य संघ)

ब्रायन मुडझिंगान्यामा कसोटी विरुद्ध श्रीलंका, हरारे 2020

नील रॉक एकदिवसीय विरुद्ध वेस्ट इंडिज, किंग्स्टन 2022

खाया झोंडो कसोटी विरुद्ध बांगलादेश, गकेबेरहा 2022

मॅट पार्किन्सन कसोटी विरुद्ध न्यूझीलंड, लॉर्ड्स 2022

कामरान गुलाम एकदिवसीय विरुद्ध न्यूझीलंड कराची 2023

बहिर शाह कसोटी विरुद्ध बांगलादेश मिरपूर 2023

हर्षित राणा टी-20 विरुद्ध इंग्लंड पुणे 2025

हे देखील वाचा: IND vs ENG 4th T20I 2025 Match Scorecard: चौथ्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडचा 15 धावांनी केला पराभव, राणा-बिश्नोईने केली कमाल

हर्षित राणाची उत्कृष्ट गोलंदाजी

हर्षित राणाने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली आणि लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल आणि जेमी ओव्हरटन यांच्या विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाजीमुळे भारताने सामन्यात पुनरागमन केले. हर्षित राणाने चार षटकांच्या स्पेलमध्ये 33 धावा देत तीन विकेट्स घेतल्या.