India Women vs Pakistan Women: आशिया कप 2024 मधील सर्वात मोठा सामना; 19 जुलै रोजी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने
हरमनप्रीत कौर 19 जुलैपासून श्रीलंकेत होणाऱ्या महिला टी-20 आशिया कपसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
हरमनप्रीत कौर 19 जुलैपासून श्रीलंकेत होणाऱ्या महिला टी-20 आशिया कपसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. हरमनप्रीत सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नईमध्ये सुरू असलेल्या टी-20 मालिकेत खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शानदार फॉर्ममध्ये असलेली सलामीवीर स्मृती मंधानाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. मुख्य संघातील 15 खेळाडूंशिवाय श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कंवर आणि मेघना सिंग यांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. (हेही वाचा - IND vs ZIM 3rd T20I 2024 Live Telecast On DD Sports & Other Platforms: आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा T20 सामना, जाणून घ्या केव्हा, कुठे आणि कसे पहाल थेट प्रक्षेपण)
भारताला स्पर्धेच्या अ गटात ठेवण्यात आले असून त्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (19 जुलै), UAE (21 जुलै) आणि नेपाळ (23 जुलै) यांचा समावेश आहे. सर्व सामने रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील. भारत गतविजेता आहे आणि सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
भारतीय संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना. , राधा यादव, श्रेयंका पाटील आणि सजना सजीवन.
राखीव: श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कंवर आणि मेघना सिंग.