Hardik Pandya's Son Gets Mercedez AMG: हार्दिक पांड्याच्या बाळाला गिफ्ट म्हणून मिळाली मर्सिडीज, इंस्टाग्रामवर केला मुलाच्या नावाचा खुलासा, पाहा Photo
हार्दिक पांड्याने सोमवारी आपल्या नुकत्याच झालेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या नवजात बाळाचे नाव उघड केले. हार्दिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या बाळाला चक्क मर्सिडीज एएमजी मॉडेलची खेळण्यातली गाडी गिफ्ट देण्यात आली आहे.
गेल्या एक वर्षापासून हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) मैदानावर सर्व काही ठीक नसले असेल परंतु मैदानाबाहेरचे त्याचे आयुष्य अगदी उलट आहे. चालू वर्ष भारतीय अष्टपैलू खेळाडूंसाठी आनंदयी ठरले आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याने बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच (Natasa Stankovic) बरोबर साखरपुड्याची घोषणा केली. मे महिन्यात या हार्दिकने लॉकडाऊनमध्ये लग्न व बाबा होणार असल्याची गोड बातमी दिली. त्यानंतर 30 जून रोजी पांड्या आणि नताशाच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं. हार्दिकने सोशल मीडियावर मुलाचा पहिला फोटो शेअर करून गोड बातमी सुनावली. आणि आता हार्दिक पांड्याने सोमवारी आपल्या नुकत्याच झालेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या नवजात बाळाचे नाव उघड केले. हार्दिकच्या बाळाचे नाव काय असेल याची उत्सुकता सगळ्यांमध्ये होती, पण अखेर एका फोटोमध्ये स्वतः हार्दिकने बाळाचे नाव अगस्त्य असल्याचे संकेत दिले आहेत. (आयपीएल 13 पूर्वी मुंबई इंडियन्स कॅम्पसाठी जसप्रीत बुमराह, क्रुणाल आणि हार्दिक पांड्या मुंबईत दाखल)
हार्दिकने स्वतः सोशल मीडियावर टॉय गाडीवर बसल्याचा फोटो पोस्ट केले आणि तेथेच आपल्या मुलाचे नाव उघड केले. हार्दिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या बाळाला चक्क मर्सिडीज एएमजी मॉडेलची खेळण्यातली गाडी गिफ्ट देण्यात आली आहे. हार्दिकनं फोटो पोस्ट करत, अगस्त्यची (Agastya) पहिली मर्सिडीज एएमजी गाडी दिल्याबद्दल एमएमजी बंगळुरू यांचे धन्यवाद, असे लिहले.
गेल्या वर्षी सप्टेंबरपासून हार्दिक भारताकडून खेळलेला नाही. लोअर-बॅकच्या दुखापतीसाठी 26 वर्षीय हार्दिकवर ऑक्टोबरमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पाठीच्या दुखापतीचा त्याला 2018 एशिया कपपासून त्रास होत होता. डिसेंबरमध्ये न्यूझीलंडमधील वनडे सामन्यासाठी त्याला इंडिया अ संघात स्थान देण्यात आले होते, मात्र, नंतर सामन्यासाठी तयार नसल्याने त्याने माघार घेतली. नंतर, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मालिका स्थगित होण्यापूर्वी हार्दिकला दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारताच्या वनडे संघात स्थान देण्यात आले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)