Hardik Pandya Back-clap Push-ups: विराट कोहलीच्या 'क्लॅप पुश-अप्स'ला हार्दिक पांड्याच दमदार उत्तर, पाहा तुम्हाला जमतेय का 'ही' नवीन एक्सरसाइज (Watch Video)

हार्दिकच्या एक्सरसाइजला एक वेगळं ट्विस्ट देत त्याने ‘फ्लाईंग पुश-अप्स’ करत नवा प्रकार शोधला. आणि आता विराटच्या या चॅलेंजचा हार्दिकने नवीन वळण दिलं आणि पुश-अप्सला एका वेगळ्या उंचीवर नेलं.

विराट कोहली आणि हार्दिक पांड्या पुश-अप्स चॅलेंज (Photo Credit: Instagram)

कोरोना संकट काळात क्रिकेट स्पर्धा आयोजित होत नसल्याने विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यासारखे स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्याची खात्री करीत आहेत. आणि भारतीय टीमच्या (Indian Cricket Team) या दोन्ही स्टार खेळाडूंमध्ये काही दिवसांपासून पुश-अपची जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत आहे. हार्दिक आणि विराट आपले जिममधील वर्कआऊटचे व्हिडीओ पोस्ट करत असतात. या वेळी हार्दिकने एक असा व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात तो उड्या मारत पुश-अप्स करताना दिसला. हार्दिकची अशी एक्सरसाइज पाहून चाहत्यांसह विराटही त्याच्यावर फिदा झाला आणि त्याच्या एक्सरसाइजला एक वेगळं ट्विस्ट देत त्याने ‘फ्लाईंग पुश-अप्स’ करत नवा प्रकार शोधला. पुश-अप्स मारताना उड्या तर त्याने मारल्याच, पण त्यासह विराटने हवेत असताना टाळ्याही वाजवून दाखवल्या. आणि आता विराटच्या या चॅलेंजचा हार्दिकने नवीन वळण दिलं आणि पुश-अप्सला एका वेगळ्या उंचीवर नेलं. (हार्दिक पांड्याच्या ‘फ्लाईंग पुश-अप्स’वर विराट कोहली फिदा, क्लॅप 'ट्विस्ट'ने पूर्ण केला चॅलेंज Watch Video)

हार्दिकने फ्लाईंग पुश-अप्स मारत असताना टाळ्या वाजवल्या, पण त्याने मागच्या बाजूला टाळ्या वाजवण्याचा पराक्रम करून दाखवला. हार्दिकने बॅक-क्लॅप पुश-अप मारल्या आणि आपला भाऊ क्रुणाल पंड्या आणि भारताचा सहकारी केएल राहुल यांना चॅलेंज केले. हार्दिकची ही नवीन एक्सरसाइज दिसण्यास जरी सोप्पी असली तरी चाहत्यांसोबत विराटलाही याचे असनुसारण करणे नक्की कठीण ठरेल.

 

View this post on Instagram

 

Hey bruh @virat.kohli Always got your back 😉 @rahulkl @krunalpandya_official guys would you like to have a go ✅🔑 and special thanks to my darling @coach_a.i.harrsha for pushing me ✅

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

दरम्यान, विराट आणि हार्दिकमध्ये पुश-अप अधिक चांगले कोणी केले हे ठरवण्यातील चाहते अद्याप व्यस्त असताना, मंगळवारी नातशा स्टॅन्कोव्हिकने विजेता घोषित केला. तिने हार्दिकला सर्वोत्कृष्ट म्हटले आणि “माय बेबू बेस्ट” असे लिहिले. दरम्यान, हार्दिकच्या या नवीन एक्सरसाइज व्हिडिओनंतर विराट आणखी एका नवीन व्हिडिओ शेअर करू शकतो अशी अपेक्षा केली जात आहे. भारतीय क्रिकेटपटू मैदानी प्रशिक्षणापासून दूर असताना बहुतेक वेळ घरीच घालवत आहेत.