IND vs ENG 4th T20I 2025: हार्दिक पांड्याकडे चौथ्या टी-20 सामन्यात मोठा विक्रम करण्याची सुवर्णसंधी, मोडणार विराट कोहलीचा रेकाॅर्ड
तिसऱ्या टी-20 मध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा २६ धावांनी पराभव केला. आता सर्वांचे लक्ष मालिकेतील चौथ्या सामन्यावर आहे. दरम्यान, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) चौथ्या टी-20 सामन्यात मोठा व्रिकम करण्याची सुवर्ण संधी आहे.
पुणे: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड मेन्स क्रिकेट संघ यांच्यातील चौथा टी-20 सामना 31 जानेवारी रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. तिसऱ्या टी-20 मध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा २६ धावांनी पराभव केला. आता सर्वांचे लक्ष मालिकेतील चौथ्या सामन्यावर आहे. दरम्यान, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) चौथ्या टी-20 सामन्यात मोठा व्रिकम करण्याची सुवर्ण संधी आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG 4th T20I 2025: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया पुण्यात पोहोचली, बीसीसीआयने फोटो केले शेअर)
तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप
खरं तर, भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप झाली. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारताला 172 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात, टीम इंडियाला 9 विकेट गमावल्यानंतर फक्त 145 धावा करता आल्या. हार्दिक पांड्या वगळता भारताकडून कोणीही 30 धावांचा टप्पा गाठू शकले नाही. राजकोटमध्ये टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने 35 चेंडूत सर्वाधिक 40 धावा केल्या. यादरम्यान, पांड्याने 1 चौकार आणि 2 षटकार मारले. पण तो टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
विराट कोहलीला टाकू शकतो मागे
तथापि, हार्दिक पांड्याने आपल्या 40 धावांच्या खेळीच्या जोरावर एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आणि माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले. खरं तर, हार्दिक पंड्याने भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 16 ते 20 षटकांत 171.50 च्या स्ट्राईक रेटने 1029 धावा केल्या आहेत. तर एमएस धोनीने भारतासाठी 16 ते 20 षटकांत 1014 धावा केल्या होत्या. तर विराट कोहली या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने 16 ते 20 षटकांत 1032 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत, जर हार्दिक पांड्याने चौथ्या टी-20 मध्ये 4 धावा केल्या तर तो 16 ते 20 पर्यंत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)