Cricketers and Wives Age Difference: 'या' टॉप 5 क्रिकेटर्स आणि त्यांच्या पत्नींमध्ये आहे वयाचे मोठे अंतर; पाहा कोण आहेत हे क्रिकेटपटू
जर दोन व्यक्तींना एकत्र आयुष्य घालवण्याची इच्छा असल तर ते कधीही, कुठेही एकत्र येऊ शकतात. दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या प्रेमात असतात तेव्हा वय फारच महत्त्वाचे नसते. इतर अनेक सामान्य व्यक्तींप्रमाणेच असेही काही क्रिकेटपटू आहेत ज्यांचा आपल्या जीवनसंगिनी सोबत मोठे अंतर आहे. आज आपण मोठ्या क्रिकेटपटूंबद्दल बोलणार आहे ज्यांनी आपल्या पेक्षा मोठ्या वयाच्या मुली सोबत लग्न केली आहेत.
Cricketers and Wives Age Differene: ते म्हणतात प्रेम आंधळं असतं! प्रेमास कोणतीही सीमा नसते आणि जर दोन व्यक्तींना एकत्र आयुष्य घालवण्याची इच्छा असल तर ते कधीही, कुठेही एकत्र येऊ शकतात. दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या प्रेमात असतात तेव्हा वय फारच महत्त्वाचे नसते. इतर अनेक सामान्य व्यक्तींप्रमाणेच असेही काही क्रिकेटपटू आहेत ज्यांचा आपल्या जीवनसंगिनी सोबत मोठे अंतर आहे. आणि आपल्या जोडीदाराशी वयात अंतर असूनही - ते मोठे असोत वा तरुण, त्यांच्यातील बरेच खेळाडू सुखी विवाहित जीवन जगत आहे. आधुनिक क्रिकेटपटू याला अपवाद ठरलेले नाहीत! आज आपण मोठ्या क्रिकेटपटूंबद्दल बोलणार आहे ज्यांनी आपल्या पेक्षा मोठ्या वयाच्या मुली सोबत लग्न केली आहेत. (टीम इंडियाच्या दिग्गज क्रिकेटपटूंसोबत लग्नानंतर ‘या’ 5 बॉलीवूड अभिनेत्रींच्या करिअरवर लागला ब्रेक)
सचिन-अंजली तेंडुलकर
सचिन आणि अंजली तेंडुलकर (अंजली मेहता) क्रिकेटविश्वातील प्रख्यात जोडप्यांपैकी एक आहे. 1990 मध्ये अंजली आणि सचिनची पहिली भेट झाली आणि 1995 मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले. अंजली सचिनपेक्षा 6 वर्षांची मोठे आहे पण वय त्यांच्या नात्यात कधीच अडथळा ठरला नाही.
शिखर धवन-आयशा मुखर्जी
टीम इंडियाचा गब्बर शिखर धवन 2012 मध्ये ऑस्ट्रेलियन बॉक्सर आयशा मुखर्जी हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला. आयशाचा फक्त घटस्फोट आणि तिला दोन मुलीचं नव्हत्या तर ती वयाने धवनपेक्षा 10 वर्ष मोठी देखील आहे. असे असूनही धवन अजिबात संकोचला नाही.
रॉबिन उथप्पा आणि शीतल गौतम
भारताचा माजी फलंदाज रॉबिन आणि टेनिसपटू शीतल गौतम यांचे 2016 मध्ये लग्न झाले. दोंघांमध्ये चार वर्षाचे अंतर असून शीतल आपल्या पतीपेक्षा मोठी आहे. तथापि, खेळांमध्ये त्यांची सामान्यतेने त्याला एकत्र बांधून ठेवले आहे.
मोहम्मद शमी आणि हसीन जहां
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज शमी आणि पत्नी हसीन जहां यांच्यातील प्रकरण चांगले गाजले होते. शमी आणि त्याची माजी पत्नी हसीन यांचे 2014 मध्ये लग्न झाले.
हार्दिक पांड्या-नताशा स्टॅन्कोव्हिक
1 जानेवारी 2020 रोजी हार्दिक आणि सर्बियन नर्तक, मॉडेल व अभिनेत्री नताशाने युएई येथे नववर्षाच औचित्य साधत साखरपुडा केला. यांनतर कोरोना लॉकडाऊन काळात दोंघांनी गुपचूप लग्न करत आपल्या पहिल्या बाळाच्या गुड-न्यूज दिली. दोघांमध्ये दोन वर्षाचे अंतर असून नताशा 29 आणि हार्दिक 27 वर्षाचा आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)