Hardik Pandya New Record: हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिजविरुद्ध केला अनोखा विक्रम, कपिल देव आणि विराट कोहलीला टाकले मागे
त्यानंतर हार्दिक पांड्याने विराट कोहली आणि माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना मागे टाकले आहे.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. या मालिकेत टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 2-1 ने पराभव करत मालिका ताब्यात घेतली. मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आली होती. याच कारणामुळे हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात कर्णधारपद भूषवले. दरम्यान, हार्दिक पांड्याने गेल्या सामन्यात 52 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या आणि पाच षटकारही ठोकले. त्यानंतर हार्दिक पांड्याने विराट कोहली आणि माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना मागे टाकले आहे.
कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पाच षटकार ठोकले. याआधी कोणत्याही भारतीय कर्णधाराने एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध इतके षटकार मारले नव्हते. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराटने याआधी 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेमध्ये 4 षटकार ठोकले होते आणि असा करणारा तो पहिला भारतीय कर्णधार असला तरी 30व्या वनडेत 5 षटकार मारून हार्दिक पंड्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. आणि प्रथम स्थान पटकावले आहे. (हे देखील वाचा: IND vs WI T20 Series 2023: वेस्ट इंडिजच्या भूमीवर टी-20 मध्ये टीम इंडियाची अशी आहे कामगिरी, रंजक आकडेवारीवर एक नजर)
वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक षटकार (भारतीय कर्णधार म्हणून)
टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्या हा वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक 5 षटकार मारणारा खेळाडू बनला आहे. या यादीत हार्दिक पांड्यानंतर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने 4 षटकार मारले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कपिल देव 3 षटकारांसह समाविष्ट आहे. यानंतर शिखर धवनचे नावही या यादीत आहे, त्याने 3 षटकारही ठोकले आहेत.
हार्दिक पांड्या - 5 षटकार
विराट कोहली - 4 षटकार
कपिल देव - 3 षटकार
शिखर धवन - 3 षटकार