Happy Birthday Shane Warne: 'बॉल ऑफ द सेंचुरी' शिवाय शेन वॉर्न याचे 'हे' 5 Bowling Spells कोणीही विसरु शकत नाही
या चेंडूला 'बॉल ऑफ द सेंचुरी' असेही म्हटले जाते. त्यांच्या अस्तित्वामुळे सामन्याचा मार्ग बदलणार्या बॉल्सने सर्वांना चकित केले आणि "हे कसे घडले?" असे विचारण्यास भाग पाडले अशी त्याची गोलंदाजी.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) याने त्याच्या 16 वर्षांच्या कारकीर्दीत जगातील प्रत्येक धोकादायक फलंदाजाला बाद केले आहे. वॉर्न वनडे सामन्यांपेक्षा कसोटी सामन्यांमध्ये अधिक धोकादायक गोलंदाज असायचा. आपल्या प्रत्येक चेंडूने खेळ बदलून टाकायची ताकद वॉर्नकडे होती. वॉर्नला क्रिकेट सोडून अनेक वर्ष झाली आहेत. परंतु आजही जागतिक क्रिकेटला वॉर्नसारखा लेगस्पिनर सापडला नाही. वॉर्न हा सलग तीन वेळा विश्वचषक जिंकणार्या ऑस्ट्रेलियन संघातही होता. 1994 मध्ये चमत्कारी गोलंदाजीने इंग्लंडचा फलंदाज माइक गेटिंग याला बाद करून त्याने क्रिकेट जगतात आश्चर्य निर्माण केले होते. या चेंडूला 'बॉल ऑफ द सेंचुरी' असेही म्हटले जाते. (विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ यांच्यामधील सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण? पाहा, शेनवॉर्न काय म्हणाला)
वॉर्नकडून आजही अनेक गोलंदाज प्रेरणा घेतात आणि त्याच्यासारखी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. काहींना यश आले तर काहींना मिळाले नाही. वॉर्नच्या बॉल ऑफ द सेंचुरीला २५ वर्ष पेक्षा जास्त झाली आहे पण, आजवर कोणीही तो चेंडू विसरू शकलेलं नाही. यादरम्यान, आणखी काही ऐतिहासिक चेंडू टाकण्यात आले. वॉर्नने टाकलेले हे चेंडूदेखील लक्षात राहणाऱ्या आहेत. त्यांच्या अस्तित्वामुळे सामन्याचा मार्ग बदलणार्या बॉल्सने सर्वांना चकित केले आणि "हे कसे घडले?" असे विचारण्यास भाग पाडले अशा काही चेंडू:
माईक गॅटिंग
4 जून 1993 रोजी मॅनचेस्टर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्नने इंग्लंडविरुद्ध 'बॉल ऑफ द सेंचुरी' टाकला. या चमत्काराच्या चेंडूवर बाद झालेला खेळाडू मायक गेटिंग होता. त्यावेळी 4 धावा काढून गेटिंग क्रीजवर होते तेव्हा वॉर्नचा एक चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जरासा बाहेर जाताना दिसला. पण बॉलने जबरदस्त वळण घेत गॅटिंगला चकित केले आणि त्याच्या ऑफ स्टंपवर गेला, ज्यामुळे सर्व चकित राहिले.
अँड्र्यू स्ट्रॉस
एजबॅस्टन येथे 2005 च्या नेटवेस्ट मालिकेदरम्यान वॉर्नने इंग्लंडचा सलामीवीर अँड्र्यू स्ट्रॉस याला स्टंपच्या बाहेरील चेंडूने क्लीन बोल्ड केले. वॉर्नच्या या बॉलला 'बॉल ऑफ द सेंचुरी' 2 असेही म्हणतात. वॉर्न या मालिकेच्या एका वर्षानंतर निवृत्त होणार होता. ही मालिका होती ज्यात केव्हिन पीटरसन याने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वॉर्नचा तो चेंडू पाहून स्ट्रॉस देखील थक्क राहिला आणि हसत मैदान सोडले. वॉर्नने या विकेटसह इंग्लंडमध्ये 100 विकेट्स घेण्याचा टप्पा पूर्ण केला होता.
कुमार संगकारा
वॉर्नने श्रीलंकेचा स्टार फलंदाज कुमार संगकाराला बाद करून टेस्ट क्रिकेटमध्ये 526 विकेट घेण्याचा पराक्रम केला. संगकाराला वॉर्नच्या ऑफ स्टंपवर जायचा चेंडू खेळायचा होता, पण संगकाराला चुकले आणि चेंडू स्टंपवरील बेल्स उडवून बाहेर गेला.
ग्राहम गूच
एका कसोटी सामन्यादरम्यान वॉर्नच्या शानदार लेगस्पिन बॉलवर इंग्लंडचा फलंदाज ग्रॅहम गूच देखील क्लीन बोल्ड झाला होता. वॉर्नच्या लेग स्टंप बाहेर जाणारा चेंडू सोडावा याची गूचने प्रयत्न केला पण, चेंडू त्यांना चकमा देत लेग स्टंपला लागली.
मायकेल अॅथर्टन
वॉर्नच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी विकेट होती ती इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल अॅथर्टन. वॉर्नही त्याचेच खरे करायचा कारण जेव्हा जेव्हा अॅथर्टन फलंदाजीला यायचे तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार वॉर्नला गोलंदाजीला आणत असे. वॉर्न अॅथर्टनविरुद्ध खूप प्रभावी होते आणि याचा पुरावा म्हणजे वॉर्नने 10 वेळा अॅथर्टनला बाद केले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज वॉर्न हा निर्विवादपणे क्रिकेट इतिहासातील आतापर्यंतचा महान स्पिनर आहे. वॉर्नने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण 1001 विकेट घेतले आहेत. कसोटीत मुरलीधरननंतर वॉर्नने दुसरे सर्वाधिक 708 विकेट घेतले आहेत.