Happy Birthday Sachin Tendulkar: 'सचिन तेंडुलकर'ला 'God Of Cricket'का म्हणतात याची प्रचिती देतात सर डॉन ब्रॅडमन, बराक ओबामा ते राहुल द्रविड यांचे हे गौरवोद्दार!

सचिनची 24 वर्षांची कारकीर्द केवळ भारतीय चाहत्यांना नव्हे तर देशा-परदेशातील दिग्गज खेळाडू, कलाकार, राजकारणी ते सामान्य व्यक्तींना भारावून टाकणारी आहे.

Sachin Tendulkar (Photo Credits: ICC@Twitter)

Sachin Tendulkar 46th Birthday:  भारतामध्ये क्रिकेट हा धर्म आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) त्याचा देव मानला जातो. त्यामुळे क्रिकेटवेड्यांसाठी आणि त्यामध्येही तुम्ही सचिन तेंडुलकरचे फॅन्स असाल तर 24 एप्रिल हा दिवस तुमच्यासाठी नक्कीच स्पेशल असेल कारण हा दिवस सचिन तेंडुलकरचा जन्मदिवस (Sachin Tendulkar Birthday) आहे. यंदा सचिन तेंडुलकर त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिनची 24 वर्षांची कारकीर्द केवळ भारतीय चाहत्यांना नव्हे तर देशा-परदेशातील दिग्गज खेळाडू, कलाकार, राजकारणी ते सामान्य व्यक्तींना भारावून टाकणारी आहे. क्रिकेटच्या मैदानातील या 'अजातशत्रू' खेळाडूबद्दल त्याच्या सोबत खेळणार्‍या आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंनी दिलेली ही पोचपावती वाचून तुम्हांलाही सचिन 'क्रिकेटचा देव'(God Of Cricket) का आहे? याची प्रचिती येईल. Happy Birthday Sachin: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर करणार 46व्या वर्षात पदार्पण, सोशल मीडियावर फॅन्स असा साजरा करणार वाढदिवस

 

सचिन तेंडुलकरबद्दल दिग्गज व्यक्तिमत्त्वांनी काढलेले गौरवोद्गार