IPL Auction 2025 Live

Happy Birthday Rohit Sharma: वनडे क्रिकेटमध्ये 3 दुहेरी शतकं, एका डावात सर्वाधिक षटकार; 'हिटमॅन' रोहित शर्मा याने नोंदवले आहे 'हे' 10 खास रेकॉर्ड

आज क्रिकेटचा 'हिटमॅन' म्हणजेच रोहित शर्मा याचा वाढदिवस आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडूंना पछाडत वनडे क्रिकेटमध्ये एक नाही तर तब्बल तीन दुहेरी शतकं ठोकली आहेत. रोहितच्या वाढदिवसाबद्दल आणि त्याच्या 10 सर्वात खास रेकॉर्डविषयी जाणून घेऊया.

भारतीय आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खास आहे. आज क्रिकेटचा 'हिटमॅन' म्हणजेच रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा वाढदिवस आहे. कोरोना व्हायरसमुळे भारतात लॉकडाउन असल्याने यंदा रोहित कुटुंबासोबत साध्यापणे वाढदिवस साजरा करणार आहे. एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतक ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज रोहितचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील बनसोडला झाला. 'हिटमॅन'च्या नावाने प्रसिद्ध टीम इंडियाचा (Indian Team) सलामीवीर रोहितला आज जगभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. जागतिक क्रिकेटचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट इतिहासातील पहिले दुहेरी शतक झळकावले. मात्र, रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडूंना पछाडत वनडे क्रिकेटमध्ये एक नाही तर तब्बल तीन दुहेरी शतकं ठोकली आहेत. यासह, वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठा डाव खेळण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. (रोहित शर्मा याने All-Time 5 पसंतीच्या भारतीय फलंदाजांचा केला खुलासा, भारताच्या सुवर्ण काळातील दिग्गज क्रिकेटर्सचा केला समावेश)

चला रोहितच्या वाढदिवसाबद्दल आणि त्याच्या 10 सर्वात खास रेकॉर्डविषयी जाणून घेऊया:

1. भारताकडून क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकण्याच्या रोहित शर्मा एलिट क्लबचा सदस्य सदस्य आहे. त्याच्याशिवाय केवळ सुरेश रैना आणि केएल राहुल हे भारतासाठी करू शकले आहेत.

2. 2014 मध्ये रोहितने श्रीलंकेविरुद्ध 264 धावा केल्या होत्या, जो वनडे क्रिकेट इतिहासातील फलंदाजाने खेळलेला सर्वाधिक डाव आहेत. त्यावेळी रोहितने 173 चेंडूत 33 चौकार आणि 9 षटकार लगावले होते.

3. एकदिवसीय सामन्यात फक्त सात वेळा फलंदाजांनी दुहेरी शतक ठोकली असून त्यापैकी रोहितने तीन दुहेरी शतकं केली आहेत. रोहितशिवाय सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, क्रिस गेल आणि मार्टिन गप्टिल यांनी दुहेरी शतक झळकावले आहे.

4. एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांच्या खेळीच्या वेळी त्याने 16 षटकार ठोकले होते.

5. एका डावात सर्वाधिक 33 चौकार ठोकण्याचा विश्वविक्रम रोहितच्या नावावरही आहे. 2014 मध्ये कोलकातामध्ये श्रीलंकेविरुद्ध 264 धावांच्या विक्रमी खेळीदरम्यान रोहितने हा विक्रम नोंदवला होता.

6. 2017 मध्ये रोहितने श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत टी-20 शतक ठोकले जेआंतरराष्ट्रीयटी-20 क्रिकेटमध्ये डेविड मिलरबरोबर संयुक्तपणे सर्वात वेगवान शतक आहे.

7. रोहितच्या नावावरही टी -20 नावाचा शानदार विक्रम आहे. रोहितने टी-20 सामन्यात आजवरचे सर्वाधिक 4 शतकं ठोकली आहेत. 2018 वेस्ट इंडिजविरुद्ध रोहितने चौथे टी-२० शतक ठोकले होते.

8. रोहित जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने टी-20, कसोटी आणि वनडे सामन्यात सर्वाधिक 3-3 शतकं ठोकली आहेत. रोहितचा हा रेकॉर्ड त्याला अधिक खास बनवते.

9. इंग्लंडमधील 2019 वर्ल्ड कप रोहितसाठी अधिक खास ठरला. रोहितने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड बांग्लादेश आणि श्रीलंकाविरुद्ध शतक ठोकले, जे टूर्नामेंटच्या एका आवृत्तीत फलंदाजाने केलेले सर्वाधिक आहे.

10. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना रोहित शर्माने शतक ठोकले होते. रोहितने 6 नोव्हेंबर 2013 रोजी कोलकाता मैदानावर वेस्ट इंडीज संघाविरूद्ध या विक्रमाची नोंद केली होती. रोहितने टेस्ट कारकिर्दीत 6 शतकं केली आहेत.

महाराष्ट्रात जन्मलेल्या रोहितने आपल्या शानदार खेळामुळे भारतीय क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज रोहित त्याचा 33 वा वाढदिवस कोरोना व्हायरसच्या या संकट काळात एकदम सध्या पद्धतीने पत्नी आणि मुलगी समायरा सोबत करणार आहे.