Happy Birthday MS Dhoni Quotes: एमएस धोनीच्या 40व्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याचे प्रेरणादायी विचार

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी 7 जुलै रोजी आपला 40 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. धोनी हा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. धोनीच्या आज चाळीशीत पदार्पण करत असताना या खास दिवशी आपण त्याचे खास विचार जाणून घेणार आहोत जे त्याच्या चाहत्यांना माहित असणे आवश्यक आहे.

(Photo Credit: File Image)

Happy Birthday MS Dhoni Quotes: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) 7 जुलै रोजी आपला 40 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. एमएस धोनी (MS Dhoni) हा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे आणि आपल्या लाडक्या खेळाडूचा वाढदिवस भारतीय क्रिकेट (Indian Cricket) चाहत्यांसाठी एक उत्सवाचा दिवस असतो. जुलै महिना सुरु झाला की धोनीच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवसाचे वेध लागले असते. त्याच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी चाहते विविध गोष्टी करत असतात. आयसीसीच्या सर्व तीन मोठे विजेतेपद पटकावणाऱ्या धोनीला आजच्या दिवशी चहुबाजूने वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहे. 'हॅपी बर्थडे डे धोनी' यापूर्वीच ट्विटरवर ट्रेंड व्हायला सुरुवात झाली आहे. धोनीच्या आज चाळीशीत पदार्पण करत असताना या खास दिवशी आपण त्याचे खास विचार जाणून घेणार आहोत जे त्याच्या चाहत्यांना माहित असणे आवश्यक आहे. (MS Dhoni Birthday Special: एमएस धोनीच्या ‘या’ 5 निर्णयाने बदलला भारतीय क्रिकेटचा चेहरा)

एमएस धोनीचे विचार

“माझ्याकडे घरी तीन कुत्री आहेत. मालिका गमावल्यानंतर किंवा जिंकल्यानंतरही ते माझ्याशी तसेच वागतात.”

“तुम्ही प्रेक्षकांसाठी खेळत नाही, तुम्ही देशासाठी खेळता.”

“जोपर्यंत पूर्णविराम येत नाही तोपर्यंत वाक्य पूर्ण होत नाही.” (मालिकेत भारताने अर्ध्यावर पराभव स्वीकारावा की नाही यावर)

“जर आपण 100% तंदुरुस्त नसलात आणि सर्वोत्तम लयीत नसाल तर ही फसवणूक आहे.”

“माझ्यासाठी शतकांपेक्षा भागीदारी तयार करणे महत्वाचे आहे, एकदा भागीदारीनंतर तुम्हाला शतकेही मिळतील.”

धोनीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर ‘कॅप्टन कूल’ म्हणून प्रसिद्ध मिळवलेल्या रांची बॉयने बांग्लादेश दौऱ्यावर 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.2007 मध्ये टी-20 व वनडे आणि नंतर 2008 मध्ये त्याला कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. धोनीने 2007 टी -20 वर्ल्ड कप, आयसीसी 2011 वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. 30 डिसेंबर, 2014 रोजी धोनीने 90कसोटी सामन्यांपैकी शेवटचा सामना खेळला. इंग्लंडमधील 2019 वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत तो भारताच्या मर्यादित ओव्हर संघाच्या सेट अपमधील प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक होता. त्यानंतर अखेरीस, 15 ऑगस्ट 2020 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now