Team India प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ‘या’ दोन खेळाडूंना ‘वेटिंग लिस्ट’मध्ये ठेवले, कसोटी सामन्यात नियमित संधींसाठी आता करावी लागणार प्रतीक्षा
हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर सारख्या फलंदाजांना प्लेइंग इलेव्हनचे नियमित सदस्य बनण्याची प्रतीक्षा लांबली असली तरीही चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे, या ज्येष्ठ खेळाडूंना शक्य तितक्या काळ संघात कायम ठेवावे, असे भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना वाटते. द्रविडने म्हटले की भारतीय कसोटी संघाच्या युवा फळीतील खेळाडूंना सीनियर होईपर्यंत नियमित संधीची प्रतीक्षा करावी लागेल.
Indian Cricket Team: हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सारख्या फलंदाजांना प्लेइंग इलेव्हनचे नियमित सदस्य बनण्याची प्रतीक्षा लांबली असली तरीही चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या ज्येष्ठ खेळाडूंना शक्य तितक्या काळ संघात कायम ठेवावे, असे भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना वाटते. आपल्या धीरगंभीर आणि भक्कम फलंदाजीने लोकांचे लक्ष वेधून घेतलेल्या विहारीने आपल्या 13 कसोटी सामन्यांपैकी केवळ एकच कसोटी सामना घरच्या मैदानावर खेळला आहे आणि कर्णधार विराट कोहलीच्या पाठीत व अय्यरच्या पोटात दुखल्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी मिळाली. विहारीने दुसऱ्या डावात नाबाद 40 धावा करून आपली योग्यता सिद्ध केली. तथापि उदयोन्मुख स्टार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि अष्टपैलू विहारी यांना खेळाच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये नियमित संधी मिळण्यासाठी का थांबावे लागेल हे भारतीय मुख्य प्रशिक्षक द्रविड यांनी स्पष्ट केले आहे. (IND vs SA: जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियाच्या पराभवामुळे केएल राहुल नाराज, सांगितले पराभवाचे कारण)
दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य प्रशिक्षक द्रविड यांनी यजमानांना दुसऱ्या डावात लढत देण्याचे नेतृत्व केल्याबद्दल विहारीचे अभिनंदन केले. त्यानंतर भारतीय मुख्य प्रशिक्षकाने अय्यरचे कौतुक केले, जो अद्याप तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतासाठी खेळलेला नाही. अय्यरने याआधी न्यूझीलंडविरुद्ध द्विपक्षीय मालिकेत शतक आणि एक अर्धशतक झळकावून भारतासाठी प्रभावी कसोटी पदार्पण केले होते. “श्रेयसने (अय्यर) दोन-तीन कसोटी सामन्यांपूर्वी असे केले आहे आणि त्याने ते नक्कीच केले आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा ते चांगले काम करत असतात आणि आशा आहे की त्यांची वेळ येईल.” याशिवाय विराट कोहली, पुजारा आणि रहाणे यांची उदाहरणे देत प्रशिक्षक द्रविडने म्हटले की भारतीय कसोटी संघाच्या युवा फळीतील खेळाडूंना सीनियर होईपर्यंत नियमित संधीची प्रतीक्षा करावी लागेल.
द्रविड म्हणाला, “जर तुम्ही आमच्या काही खेळाडूंकडे पाहिले जे आता वरिष्ठ खेळाडू आहेत आणि एक प्रकारचे वरिष्ठ खेळाडू मानले जातात, त्यांनाही त्यांच्या वेळेची वाट पहावी लागली आणि त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप धावाही कराव्या लागल्या आहेत.” दरम्यान दक्षिण आफ्रिकेने वांडरर्स स्टेडियमवर भारतावर पहिला कसोटी विजय नोंदवल्यानंतर, टीम इंडिया मंगळवारी मेलिकेच्या निर्णायक सामन्यात काही बदलांसह उतरण्याची शक्यता आहे. मालिकेची तिसरी आणि शेवटची कसोटी केप टाउनच्या न्यूलँड्स येथे खेळवली जाईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)