Hammika Niroshana Shot Dead: श्रीलंकेचा माजी U19 कर्णधार धम्मिका निरोशना यांची गोळ्या झाडून हत्या
श्रीलंकेतील अंबालांगोडा (Ambalangoda) येथे त्यांच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
श्रीलंकेच्या अंडर-19 क्रिकेट (Sri Lanka Cricke) संघाचे माजी कर्णधार धम्मिका निरोशाना (Dhammika Niroshana) यांची वयाच्या 41 व्या वर्षी हत्या झाली आहे. श्रीलंकेतील अंबालांगोडा (Ambalangoda) येथे त्यांच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे स्थानिक परिसरात खळबळ उडाली आहे. तर क्रिकेट वर्तुळाला (Cricket News) धक्का बसला आहे. गोळीबार करणाऱ्याची ओळख पटवण्यासाठी आणि त्याला पकडण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. निरोशना यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.
निरोशाना, उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आणि मध्यम फळीतील फलंदाज होते. त्यांच्या खेळाच्या कारकिर्दीत त्यांना श्रीलंकेच्या क्रिकेटमधील उगवता तारा असे म्हटले जात असे. त्यांनी 2001 ते 2004 या कालावधीत गॅले क्रिकेट क्लबसाठी 12 प्रथम श्रेणी सामने आणि 8 लिस्ट-ए खेळ खेळले, 300 हून अधिक धावा केल्या आणि 19 बळी घेतले. सन 2000 मध्ये श्रीलंकेच्या अंडर 19 संघासाठी पदार्पण करून, त्यांनी दोन वर्षे अंडर-19 कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भाग घेतला. निरोशानाने 10 सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या अंडर 19 संघाचे नेतृत्व देखील केले, फरवीझ महारूफ, अँजेलो मॅथ्यूज आणि उपुल थरंगा यांसारखे त्यावेळचे आघाडीचे (भविष्यातील तारे) खेळाडू, ज्यांनी पुढे श्रीलंकेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले. डिसेंबर 2004 मध्ये निरोशानाने शेवटचा स्पर्धात्मक क्रिकेट सामना खेळला. (हेही वाचा, Team India Squad for Sri Lanka Tour: श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआय आज करू शकते टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी)
नरोशना यांचे चाहते असलेल्या नेटिझन्सनी X (पूर्वीचे ट्विटर) वर निरोशाना यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. एका युजरने म्हटले, “भाऊ, खूप लवकर गेला. दुसऱ्यानेही तशीच प्रतिक्रिया दिली. एका एक्स वापरकर्त्याने लिहीले की, तुम्ही त्याला अनुशासनात्मकतेने पाहिले? तुम्हाला त्याच्या विरुद्ध न्यायालयीन खटले माहित आहेत का? तो हरला आहे.. तुम्ही असे गृहीत धरले आहे की तो एक शिस्तप्रिय माणूस आहे कारण त्याने खेळ केला आहे? असे, वापरकर्त्याने लिहिले. आणखी एका वापरकर्त्याने अशीच काहीशी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, “म्हणजे तो क्रिकेट मैदानातून गुंड म्हणून खेळायला गेला की, अंडरवर्ल्डचा लॉर्ड?
दरम्यान, निरोशाना यांच्या निधनामुळे क्रिकेट वर्तुळातील त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांनी लहान वयात खेळात दिलेल्या योगदानाबद्दल अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान, निरोशाना याच्यावर झालेल्या हल्ल्यासंबंधी अद्याप कोणताही तपशील पुढे आला नाही. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे. हा हल्ला त्याच्यावर नेमक्या कोणत्या कारणास्तव झाला याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.