हॅमिल्टन मसकद्जा याने रचला इतिहास; अंतराराष्ट्रीय टी-20 क्रिकेट करिअरमधील अखेरच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा कर्णधार हॅमिल्टन मसकद्जाने अफगाणिस्तान संघाविरूद्ध त्याच्या आंतरराष्ट्रीय टी -20 करिअरच्या अंतिम सामन्यात विक्रमाला गवसणी घातली आहे. मसकद्जा याने आक्रमक खेळी करत झिम्बाब्वेच्या संघाला एक हाती विजय मिळवून दिला आहे. मसकद्जा याच्या अंतरराष्ट्रीय टी-20 करिअरचा हा अंतिम सामना होता. टी-20 करिअरच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मसकद्जा याच्या नावावर नोंदविण्यात आला आहे. या विजयासह झिम्बाब्वेने टी-20 सामन्यांत अफगाणिस्तानच्या संघाला मात करुन सलग विजयावर पूर्णविराम लावला आहे.

hamilton masakadza (Getty Images)

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान (Zimbabwe Vs Afganistan) यांच्यात शुक्रवारी रोमांचक टी-20 सामना पार पडला. झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा कर्णधार हॅमिल्टन मसकद्जाने (Hamilton Masakadza) अफगाणिस्तान संघाविरूद्ध त्याच्या आंतरराष्ट्रीय टी -20 करिअरच्या अंतिम सामन्यात विक्रमाला गवसणी घातली आहे. मसकद्जा याने आक्रमक खेळी करत झिम्बाब्वेच्या संघाला एक हाती विजय मिळवून दिला आहे. मसकद्जा याच्या अंतरराष्ट्रीय टी-20 करिअरचा हा अंतिम सामना होता. टी-20 करिअरच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मसकद्जा याच्या नावावर नोंदविण्यात आला आहे. या विजयासह झिम्बाब्वेने टी-20 सामन्यांत अफगाणिस्तानच्या संघाला मात करुन सलग विजयावर पूर्णविराम लावला आहे.

झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात जोरदार लढत पाहायला मिळाली. टॉस जिंकून अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तानच्या संघाने झिम्बाब्वेच्या संघासमोर केवळ 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघाने 3 विकेट्स गमावून या सामन्यात विजय मिळवला होता. यात झिम्बाब्वेचा कर्णधार हॅमिल्टन मसकद्जा याने तडाखेबाज खेळी करत झिम्बाब्वेच्या संघाला विजय मिळवून दिला आहे. तसेच झिम्बाब्वे संघाकडून सर्वाधिक 300 सामने खेळणारा मसकद्जा हा एकमेक खेळाडू ठरला आहे. हे देखील वाचा-Ind Vs SA 3rd T20 Match: रिषभ पंत याच्या अडचणी वाढल्या; भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना ठरु शकतो अखेरचा

मकसद्जा याने झिम्बाब्वे क्रिकेट संघासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. मकसद्जा याने टी-20 क्रिकेटमध्ये 1 हजार हून अधिक धावा केल्या आहेत. 36 वर्षीय मकसद्जा याने 38 कसोटी सामन्यांमध्ये 34.04 च्या सरासरीने 2223 धावा केल्या आहेत. यात 5 शतकांचा समावेश आहे, तसेच 158 हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. एकदिवसीय सामन्यात मकसद्जा याने 209 सामने खेळून 27.73 च्या सरासरीने एकूण 5 हजार 658 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने नाबाद 178 धावांची खेळी केली आहे. टी-20 करिअरमधील 60 सामन्यात त्याने 1 हजार 591 धावा केल्या आहेत. टी-20 सामन्यातील त्याचा सर्वोत्तम नाबाद 92 धावा केल्या आहेत.