CSK vs GT, Qualifier 1: चेपॉकमध्ये चेन्नईला आव्हान देणार गुजरात, खेळपट्टीच्या अहवालावरून जाणून घ्या कोण आहे कोणावर भारी
CSK vs GT (Photo Credit - Twitter)

CSK vs GT आयपीएल 2023 चा (IPL 2023) पहिला क्वालिफायर सामना चेन्नई विरुध्द गुजरात (CSK vs GT) खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (Chennai's Chepauk Stadium) खेळवला जाईल. हा सामना संध्याकाळी 7.30 पासून सुरू होईल. क्वालिफायर 1 जिंकणारा संघ थेट आयपीएलच्या अंतिम फेरीत जाईल. त्याचबरोबर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. त्याला एलिमिनेटरमध्ये विजेत्या संघाविरुद्ध क्वालिफायर-2 खेळावे लागेल. दरम्यान, दोन्ही संघाच्या हेड टू हेड बद्दल बोलयचे झाले तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण तीन सामने झाले आहेत. गुजरातने तीनही वेळा विजय मिळवला. हे सामने ब्रेबॉर्न, वानखेडे आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आले. त्याचवेळी चेपॉक स्टेडियमवर दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने असतील.

खेळपट्टीचा अहवाल

चेपॉकवर धावा केल्या जातात. येथे फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व असले तरी मोसमाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये येथे 200 हून अधिक धावा झाल्या. गेल्या काही सामन्यांमध्ये स्कोअरिंग रेट निश्चितच कमी झाला आहे. अशा स्थितीत आजही फिरकी खेळपट्टी पाहायला मिळते. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करणे पसंत करतो. येथील मैदानावर धावांचा पाठलाग करताना संघ बऱ्यापैकी यशस्वी ठरला आहे. चेपॉक येथे या मोसमात एकूण सात सामने खेळले गेले. ज्यामध्ये चेन्नईने चार जिंकले आणि तीन हरले. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने चार वेळा विजय मिळवला.

हवामान स्थिती

चेन्नईचे हवामान उष्ण असेल. मंगळवारी चेन्नईमध्ये हवामान स्वच्छ असेल, दिवसा खूप गरम असेल. पावसाची शक्यता नाही. दिवसाचे कमाल तापमान 32 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. मात्र सामना हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. अशा परिस्थितीत त्या काळात उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळेल. (हे देखील वाचा: Mumbai Indians 'Saiyyan' Singing Video: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवसह इतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी दाखवले आपले गायन कौशल्य, पहा मजेशीर व्हिडीओ (Watch)

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11

चेन्नई: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थिकशाना

गुजरात: शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, अल्झारी जोसेफ, नूर अहमद