GT VS DC, IPL 2024 Head to Head: गुजरात आणि दिल्ली यांच्यात चुरशीचा आयपीएल सामना, आकडेवारीत कोण कुणावर वरचढ? घ्या जाणून
प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित आठ लढतींमध्ये त्यांना सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यामध्ये आज आयपीएलमधील (IPL) साखळी फेरीचा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. गुजरातने सहा सामन्यांमधून तीन सामन्यांत विजय मिळवले असून दिल्लीने सहा सामन्यांमधून दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. या दोन्ही संघांच्या कामगिरीत चढ-उतार दिसून आले आहेत. गुजरातने दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी झाल्यानंतर मागच्या दोन्ही आयपीएलमध्ये फायनल गाठली आहे. दोन मोसमांत उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर यंदाच्या मोसमात गुजरातला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. शुभमन गिलच्या नेतृत्वात चढ-उतारामधून जात आहे. (RR Beat KKR: राजस्थानने कोलकात्याचा दोन गडी राखून केला पराभव, बटलरने संघाला एकाहाती मिळवून दिला विजय)
दिल्ली संघाने सहा सामन्यांमधून दोन सामन्यांत विजय, तर चार सामन्यांत पराभव पत्करला आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित आठ लढतींमध्ये त्यांना सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. रिषभ पंत (194 धावा), ट्रिस्टन स्टब्स (189 धावा) या दोन फलंदाजांनी दिल्लीसाठी छान खेळ केला आहे. डेव्हिड वॉर्नर (166 धावा) व पृथ्वी शॉ (151 धावा) यांनीही चमक दाखवली आहे परंतू यांना वगळता कोणत्याच खेळाडूंनी चांगला खेळ दाखवू शकलेले नाही आहे. तसेच गोलंदाजांनी दबावाखाली आपला खेळ उंचावण्याची गरज आहे
उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. गुजरात टायटन्स त्यांचा शेवटचा सामना जिंकून येत आहे तर दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला होता. लीगमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांकडून फारशी चांगली कामगिरी झालेली नाही.