IND vs WI: रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारत-वेस्ट इंडिज संघाला मिळाला अमेरिकेचा व्हिसा
त्यांनाही लवकरच अमेरिकेचा व्हिसा मिळणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिले तीन सामने कॅरेबियन भूमीवर खेळले गेले, तर उर्वरित दोन सामने आता फ्लोरिडा, यूएसए (US) येथे खेळले जाणार आहेत. उर्वरित दोन सामने अनुक्रमे 6 आणि 7 ऑगस्ट रोजी होणार आहेत. दोन्ही संघातील काही खेळाडू फ्लोरिडाला पोहोचले आहेत आणि काही लवकरच पोहोचतील. खरेतर, यापूर्वी व्हिसाच्या समस्येमुळे उरलेले दोन्ही सामने कॅरेबियन भूमीवर व्हावे लागतील अशा बातम्या आल्या होत्या. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, “ज्या खेळाडूंकडे आधीच यूएस व्हिसा आहे ते मियामीमध्ये आहेत आणि बाकीचे खेळाडू त्यांच्या व्हिसाच्या कागदपत्रांवर प्रक्रिया करण्यासाठी जॉर्जटाउन, गयाना येथील यूएस दूतावासात गेले आहेत. त्यांनाही लवकरच अमेरिकेचा व्हिसा मिळणार आहे.
जॉर्जटाउन ते मियामीचे फ्लाइट पाच तासांचे आहे. वेस्ट इंडीज संघ आणि टीम इंडियाचे काही सदस्य फ्लोरिडाला पोहोचले आहेत. भारत सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. भारताने पहिला सामना जिंकला, तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने पुनरागमन केले. भारताने तिसरा सामना जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. (हे देखील वाचा: Rohit Sharma Injury Update: चौथी टी-20; दुखापतग्रस्त रोहित शर्मा होवू शकतो संघातून बाहेर? घ्या जाणून)
बीसीसीआयने आगामी भारत दौऱ्यांचे वेळापत्रक केले जाहीर
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी आगामी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. भारताचा आंतरराष्ट्रीय होम सीझन 2022-23 सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेने सुरू होईल आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची T20I आणि एकदिवसीय मालिका होईल.