George Floyd Death: डॅरेन सॅमी याची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICC कडे मागणी, क्रिकेट मंडळांनीही केले आवाहन

याच्या विरोधात वेस्ट इंडिजचा माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार डॅरेन सॅमी म्हणाला आयसीसीने एकतर वंशवादविरोधात आवाज उठवावा किंवा या समस्येचा भाग म्हणून घेण्यासाठी तयार असावे. 

डॅरेन सॅमी (Photo Credit: Getty Images)

जॉर्ज फ्लॉयड (George Floyd), आफ्रिकन-अमेरिकी व्यक्तीचा पोलीस अत्याचारात मृत्यू झाल्यानंतर अमेरिका समावेश जगातील अन्य देशांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. पोलीस आणि प्रशासनाविरुद्ध नागरिक आक्रमक झालेले दिसत आहे. 25 मे पासून अमेरिकेच्या (America) मिनियापोलिस (Minneapolis) शहरात सुरु झालेले आंदोलन आता अनेक शहरांत पसरले आहे. याच्या विरोधात वेस्ट इंडिजचा माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार डॅरेन सॅमी (Darren Sammy) याने मंगळवारी आयसीसीकडे (ICC) विनंती केली की, क्रिकेट जगाने एकतर वंशवादविरोधात आवाज उठवावा किंवा या समस्येचा भाग म्हणून घेण्यासाठी तयार असावे. क्रीडा विश्वातील अनेक खेळाडूंनी जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूचा निषेध नोंदवला आहे. फ्लोयडच्या अटकेचे एक व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे ज्यामध्ये एक पांढरा पोलिस अधिकारी मरण्यापूर्वी सुमारे 9 मिनिटं फ्लॉइडच्या मानेवर गुडघा टेकलेला दिसला. या घटनेचा आयसीसीने विरोध केला आणि आयसीसी व अन्य क्रीडा मंडळांना अशा घटनेविरोधात ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. (George Floyd Killing: जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूने वेस्ट इंडीज स्टार क्रिस गेल संतापला, क्रिकेटमधील काळा-पांढरा भेदभावाचा केला खुलासा)

सॅमीने सोशल मीडियावरील पोस्टच्या मालिकांमध्ये काळ्यांच्या समस्यांबद्दल लिहिले. त्याने ट्वीट केले की, "ताजा व्हिडिओ पाहिल्यानंतर क्रिकेट जगणे काळ्यां विरोधात अन्यायविरूद्ध आता उभे राहायला हवे, जर तुम्ही असे केले नाही तर या समस्येचा तुम्हीही भाग बनलं."

सॅमी म्हणाला की वर्णद्वेषाचा सामना केवळ अमेरिकेतच नाही, तर जगभरातील काळ्यांना करावा लागतो. त्याने सवाल केला की, "आयसीसी आणि इतर सर्व बोर्ड पाहू शकत नाही जे माझ्यासारख्या लोकांचे काय होते. माझ्यासारख्या लोकांवर सामाजिक अन्याय होताना दिसत नाही."

सॅमी म्हणाला, "काळे लोकं बर्‍याच काळापासून सहन करत आहेत. मी सेंट लुसियात आहे आणि जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूबद्दल मला खेद आहे. आपण बदल आणण्यासाठी आपले समर्थन देखील देता का? हॅशटॅग ब्लॅक लाइव्ह्स मॅटर."

यापूर्वी, वेस्ट इंडीजचा स्टार फलंदाज क्रिस गेलने जेंटलमेन्स गेम म्हटला जाणारा क्रिकेट वर्णद्वेषापासून मुक्त नसल्याचा दावा करीत स्वतः कारकिर्दीत अनेकदा वर्णभेदाच्या वक्तव्याचा सामना केला असल्याचा खुलासा केला.