शाहिद आफ्रिदीच्या काश्मीर, पंतप्रधान मोदींवरील विवादित टिप्पणीवर गौतम गंभीर ने सुनावलं; युवराज, हरभजन सिंह यांना झाला पश्चात्ताप

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि विद्यमान खासदार गौतम गंभीर याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला चोख प्रत्युत्तर दिले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भ्याड आणि काश्मीरबाबतचे वादग्रस्त विधान केल्याबद्दल गंभीरने माजी पाकिस्तानी अष्टपैलूवर टीका केली. दुसरीकडे, हरभजन सिंह आणि युवराज सिंह यांना आफ्रिदीसाठी मदत मागण्यासाठी पश्चात्ताप झाला.

शाहिद आफ्रिदी, युवराज सिंह आणि हरभजन सिंहचे फाइल फोटो (Photo Credits: Getty Images)

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि विद्यमान खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला (Shahid Afridi) चोख प्रत्युत्तर दिले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भ्याड आणि काश्मीर (Kashmir) बाबतचे वादग्रस्त विधान केल्याबद्दल गंभीरने माजी पाकिस्तानी अष्टपैलूवर टीका केली. आफ्रिदीने नुकताच काश्मीर दौरा केला. या दरम्यान आफ्रिदीचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात तो भारताचे पंतप्रधान मोदी आणि काश्मीर संबंधी टिप्पणी करत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आफ्रिदी सुरुवातील कोरोना व्हायरसबद्दल बोलत आहे. आफ्रिदी म्हणाला, कोरोनापेक्षा मोठा रोग मोदींच्या मनात आणि डोक्यात आहे. तो आजार धर्माचा आहे. त्या आजारावर ते सत्ता चालवत आहे. आमच्या काश्मिरी लोकांवर अत्याचार करत आहेत, याचं उत्तर त्यांना द्यावंच लागेल. आफ्रिदीच्या या टिप्पणीवर गंभीरने त्याला कडक शब्दात सुनावले. गंभीरने आफ्रिदीची 16 वर्षीय म्हणून खिल्लीही उडवली. (Coronavirus: पाकिस्तानी हिंदूंच्या मदतीला आला शाहिद आफ्रिदी, मंदिरात आवश्यक खाद्यपदार्थांचे केले वितरण)

गंभीरने लिहिले की, "पाकिस्तानकडे 7 लाख सैनिक आहेत आणि त्यांच्या मागे 200 करोड लोक उभे आहेत, असं 16 वर्षांच्या शाहिद आफ्रिदीचे म्हणणे आहे. तरीही तुम्ही 70 वर्षांपासून काश्मीरसाठी भीक मागत आहात. आफ्रिदी, इमरान आणि बाजवा सारखे जोकर पाकिस्तान व जनतेला बेवकूफ बनवण्याच्या हेतूने भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्याविरूद्ध विषाची झुंबड उडवू शकतात, पण काश्मिर न्याय दिवसापर्यंत मिळणार नाही! तुम्हाला बांग्लादेश आठवते का?" दुसरीकडे, हरभजन सिंह (Harbhajan Singh) आणि युवराज सिंह (Yuvraj Singh) यांना आफ्रिदीसाठी मदत मागण्यासाठी पश्चात्ताप झाला. आफ्रिदीने साऱ्या सीमा ओलांडल्या असल्याचं हरभजन म्हणाला. युवराज म्हणाला की आता आफ्रिदीला पाठिंबा दर्शविल्याबद्दल पश्चात्ताप होत आहे.

गंभीरचे ट्विट

“देशासाठी खेळलेला एक जबाबदार भारतीय म्हणून मी असे शब्द कधीही स्वीकारणार नाही. मानवतेसाठी मी तुमच्यासाठी आवाहन केले. पुन्हा कधीही नाही, ”युवराजने ट्विट केले.

हरभजन इंडिया टुडेशी बोलताना म्हणाला, “मला वाटले की तो आमचा मित्र आहे पण मित्र कसे वागते नाही. हे असभ्य आहे. त्यांनी आपल्या हद्दीत राहायला हवे होते परंतु दुर्दैवाने आपल्या देशाबद्दल आणि पंतप्रधानांशी बोलणे चालू ठेवले आहे. ”

या व्हिडिओमध्ये आफ्रिदी भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदनबद्दल म्हणाला की, "आम्ही त्याच्या माणसांनाहवेत मारून आदराने चहा पियुन परत पाठवले. आम्ही जगाला हा संदेश दिला आहे की आम्ही शांतीप्रिय लोक आहोत, आपण प्रेम समजून घेणारे लोक आहोत. होय, परंतु जेव्हा तुम्ही प्रेमाने बोलणार तेव्हा."

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now