IPL Auction 2025 Live

Gautam Gambhir slams on Pan Masala: पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंवर गौतम गंभीर भडकला, म्हणाला...

आयपीएल सामन्यांदरम्यान, सेहवाग, गावस्कर, कपिल, गेल हे सर्वजण एका पान मसाला कंपनीच्या माऊथ फ्रेशनरची जाहिरात करताना दिसले.

Gautam Gambhir (Photo Credit - Twitter)

गौतम गंभीर (Gautam Gambhir) त्याच्या एकामागून एक विधानांमुळे सतत चर्चेत असतो. पण, अलीकडे सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, कपिल देव यांसारख्या दिग्गजांवर टीका करून तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. गौतम गंभीरने या सर्वांवर थेट हल्ला चढवला नाही. पण नाव न घेताही बरेच काही बोलून गेला आहे. वास्तविक, गंभीरचे ताजे विधान पान-मसाला ब्रँडचा प्रचार करणाऱ्या प्रसिद्ध क्रिकेटपटूंशी संबंधित आहे. आयपीएल सामन्यांदरम्यान, सेहवाग, गावस्कर, कपिल, गेल हे सर्वजण एका पान मसाला कंपनीच्या माऊथ फ्रेशनरची जाहिरात करताना दिसले. गंभीर म्हणाला की, एक आदर्श असलेला क्रिकेटपटू असे कसे करू शकतो. (हे देखील वाचा: IND vs ENG Test Series 2025 And 2029: टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील आगामी कसोटी मालिकेसाठी ठिकाण करण्यात आले निश्चित, या स्टेडियममध्ये खेळवले जातील सामने)

पान मसाला प्रचार करणाऱ्या क्रिकेटपटूंवर गंभीर संतापला

गौतम गंभीरच्या म्हणण्यानुसार, त्याने आयुष्यात पान मसाल्याची जाहिरात करण्याचा कधी विचार केला नव्हता. हे केवळ हास्यास्पदच नाही तर खेदजनकही आहे. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगतो की जर तुम्ही तुमचा आदर्श निवडत असाल तर नेहमी काळजी घ्या. पान मसाल्याची जाहिरात करुन क्रिकेटपटूंना कोणते उदाहरण मांडायचे आहे? गौतम गंभीरने आपल्या वक्तव्यात कोणत्याही क्रिकेटपटूचे नाव घेतले नाही. पण त्यांच्या मते आता त्यांची ओळख त्यांचे नाव नसून त्यांचे काम आहे. देशातील करोडो मुले त्यांना फॉलो करतात. गंभीर म्हणाला की, पैसे कमवण्याचे इतर मार्ग आहेत, मग पान मसाल्याची जाहिरात का करायची?

पहा व्हिडिओ

गौतम गंभीरने 3 कोटींची ऑफर नाकारली

डावखुरा फलंदाज गौतम गंभीरने सांगितले की जेव्हा त्याने 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद सोडले तेव्हा त्याला एका पान मसाला कंपनीकडून 3 कोटी रुपयांची ऑफर आली होती. पण, त्यांनी आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही आणि ती नाकारली. गंभीर म्हणाला, “मला हवे असते तर मी ते पैसे घेऊ शकलो असतो. पण मी ती जाहिरात सोडली कारण मी नेहमी मानतो की मला जे योग्य वाटतं मी तेच करतो. सचिन तेंडुलकरलाही पान मसाला ब्रँडकडून 20-30 कोटींची ऑफर मिळाली होती. पण त्यांनी ती जाहिरात नाकारली कारण त्यांनी आपल्या वडिलांना वचन दिले होते की ते अशी जाहिरात कधीच करणार नाही. त्यामुळेच ते या देशाचे सर्वात मोठे आदर्श आहेत.