टीम इंडियातील 'या' 5 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केले पदार्पण
2019 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी संस्मरणीय राहिले. अनेक खेळाडूंनी टीम इंडियात पदार्पणही केले. काही चमकले तर काही अजून चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आज आपण इथे पाहूया कोणत्या खेळाडूंनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
2019 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी (Indian Cricket) संस्मरणीय राहिले. ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा मालिका विजयानंतर इंग्लंडमधील आयसीसी क्रिकेट विश्वचषकमधील खेळाडूंची प्रभावी कामगिरीने भारतीय क्रिकेटचा स्तर वाढवला आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळण्यात आलेल्या विश्वचषकमध्ये जरी जिंकता आले नसले तरीही टीम इंडियाने (Team India) त्यांच्या प्रभावी खेळीने सर्व चाहत्यांचे मनोरंजन तर केलेचं त्यांची मैदानाबाहेर प्रेक्षकांची मनंही जिंकली. विश्वचषकच्या सेमीफायनल फेरीत भारताचा पराभव झाला असला तरीही संघ खचून गेला नाही आणि पुन्हा नव्याने सुरुवात करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. यादरम्यान, अनेक खेळाडूंनी टीम इंडियात पदार्पणही केले. काही चमकले तर काही अजून चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. (Syed Mushtaq Ali Trophy 2019: पृथ्वी शॉ याच्या बॅटवर विराट कोहली याने लिहीला खास संदेश; पाहा Photo)
आज आपण इथे पाहूया कोणत्या खेळाडूंनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
शाहबाझ नदीम
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्याच्या तब्बल 15 वर्षानंतर झारखंडच्या शाहबाझने वयाच्या तिशीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नदीमने दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध रांची टेस्ट सामन्यातून पदार्पण केले. आफ्रिकाविरुद्ध 2 डावात नदीमने 4 विकेट घेतल्या. याआधीही नदीमची संघात निवड झाली होती, पण त्याला पदार्पण करण्याची संधी कधीच मिळाली नाही.
नवदीप सैनी
दिल्ली संघाचा वेगवान गोलंदाज सैनीने वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सैनीने विंडीजविरुद्ध 3 टी-20 सामने खेळत 5 गडी बाद केले. यानंतर सैनीला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेसाठीही भारतीय संघात स्थान मिळाले होते. सैनीने आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम सामान्यत 2 ओव्हरमध्ये 59 धावा लुटवल्या, ज्यामुळे नंतर त्याला संघातून वगळण्यात आले.
राहुल चाहर
20 वर्षीय राहुलने यावर्षी ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 सामन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आजवर केवळ एका आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवाय, पदार्पणात तो काही खास दाखवू शकला नाही आणि तीन ओव्हरमध्ये 27 धावा देऊन एक विकेट घेतली. कार्लोस ब्रेथवेट याच्या रूपात राहुलए पहिला आंतरराष्ट्रीय विकेट आपल्या नावावर केली.
शिवम दुबे
नुकत्याच संपुष्टात आलेल्या बांग्लादेश मालिकेत सिक्सर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवम दुबे याने डेब्यू केले. शिवमने बांग्लादेशविरुद्ध दिल्लीमधील पहिल्या टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शिवम डेब्यू सामन्यात काही खास कामगिरी करू शकला नाही आणि बांग्लादेशविरुद्ध 3 सामन्यात 10 धावा केल्या आणि 3 गडी बाद केले.
शुभमन गिल
हॅमिल्टन (Hamilton) मध्ये शुभमनला एमएस धोनी याच्याकडून कॅप मिळाली आणि तो टीम इंडियाचा 227 वा वनडे क्रिकेटपटू बनला आहे. न्यूझीलंड दौऱ्यात केएल राहुल याच्या जागी गिलचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला होता. गिलने न्यूझीलंडविरुद्ध 2 सामन्यात 16 धावा केल्या.
2020 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकसाठी निवड समिती त्यांच्या स्टार खेळाडूंना विश्रांती देत नवीन खेळाडूंना संधी देत आहे. त्यामुळे, पुढील वर्षीदेखील काही नवीन चेहरे भारतीय संघात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)