Fox Cricket ने ऑस्ट्रेलियाच्या 2023 वर्ल्ड कप संभाव्य प्लेयिंग XI लिस्टमधून आरोन फिंच ला वगळले, डेविड वॉर्नर ने व्यक्त केली निराशा

फॉक्स क्रिकेटने भारतात होणार्‍या 2023 विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संभाव्य प्लेयिंग इलेव्हनचा अंदाज वर्तविला, पण ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांचा कर्णधार आरोन फिंचचा मात्र फॉक्स क्रिकेटने समावेश केला नाही. फिंचचा फलंदाज जोडीदार आणि सलामीवीर वॉर्नरला या प्लेयिंग इलेव्हनने मात्र निराश केले.

डेविड वॉर्नर आणि आरोन फिंच (Photo Credit: Getty Images)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगभरातील सर्व लोकांच्या नियमित दिनक्रमावर ब्रेक लागला आहे. शाळा, कार्यालयं महाविद्यालये ते जिम, ग्रंथालये, विमानतळ, रेल्वे स्थानके या सर्व गोष्टी बॅकफूटवर टाकल्या गेल्या आहेत कारण लोकांनी स्वतःला या घातक व्हायरसपासून बचाव करण्यासाठी स्वतःला घरात बंद करून घेतले आहे. क्रिकेटसह जगभरातील जवळजवळ प्रसिद्ध स्पर्धा पुढे ढकल्याने क्रीडा जगाला सर्वात कठीण काळाचा सामना करावा लागत आहे. क्रीडा क्षेत्रातील जवळजवळ प्रत्येक कार्यक्रम पुढे ढकलला जात आहे आणि रिपोर्ट करण्यासाठी लाईव्ह खेळ नसल्याने क्रिकेट वेबसाइट वेगवेगळ्या पद्धतीने चाहत्यांना आकर्षित करत आहेत. चाहत्यांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने फॉक्स क्रिकेट (Fox Cricket) अ‍ॅशेस आणि वर्ल्ड कप सारख्या भविष्यातील आगामी कार्यक्रमांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संभाव्य इलेव्हन शेअर केला. शुक्रवारी वेबसाइटने भारतात होणार्‍या 2023 विश्वचषक (World Cup) स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या (Australia) संभाव्य प्लेयिंग इलेव्हनचा अंदाज वर्तविला.

आयसीसीच्या या कार्यक्रला अद्याप जवळपास 4 वर्षे शिल्लक असल्याने स्वाभाविकच संभाव्य इलेव्हनमध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे पण ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांचा कर्णधार आरोन फिंचचा (Aaron Finch) मात्र फॉक्स क्रिकेटने समावेश केला नाही. 'फॉक्स क्रिकेट' म्हणाला की फिंच आणि डेविड वॉर्नर (David Warner) तोवर 36 वर्षाचे होतील, पण वॉर्नरला वगळता फिंचला प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवता आले नाही. फिंचच्या जागी 22 वर्षीय जोश फिलिपला स्थान मिळाले. फिंचचा फलंदाज जोडीदार आणि सलामीवीर वॉर्नरला या प्लेयिंग इलेव्हनने मात्र निराश केले. वॉर्नरने ट्विटरवर फिंचला टॅग केले, असे लिहिले की, "बहा आरोन फिंच आपण निवृत्त होत असल्याचे त्यांना सांगितले आहे. कठोर, माझ्या मते निराशाजनक बातम्या." फिंचने देखील ही पोस्ट शेअर केली आणि त्याला वगळल्याबद्दल गोंधळलेले दिसला.

फिंचचे ट्विट

फॉक्स क्रिकेटच्या या लिस्टमध्ये स्टीव्ह स्मिथने तिसर्‍या क्रमांकाचा फलंदाज म्हणून आपले स्थान कायम ठेवले आणि फिंच संघात नसल्यामुळे तो संघाचे नेतृत्व करेल असे भाकीत वर्तवले. 2019 सालचा सर्वश्रेष्ठ कसोटीपटू, मार्नस लाबूशेन चौथ्या तर अ‍ॅलेक्स कॅरी विकेटच्या मागे राहून पाचव्या स्थानावर फलंदाजी करेल. मधल्या फळीतील फलंदाज कॅमरून ग्रीनने सहाव्या क्रमांकावर कब्जा केला आहे तर ग्लेन मॅक्सवेल 34 वर्षांचा असूनही संघात त्याचे स्थान कायम ठेवले आहे. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सची वेगवान जोडीसह अ‍ॅस्टन अगर आणि एडम जम्पाने प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान निश्चित केलं.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now