Dilhara Lokuhettige: आयसीसीची मोठी कारवाई; श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहारा लोकुहेटिगेवर 8 वर्षांची घातली बंदी
आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक न्यायाधिकरणाने भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल श्रीलंकेचा 40 वर्षीय खेळाडू दिलहारा दोषी ठरला आहे.
श्रीलंकेचा माजी अष्टपैलू दिलहारा लोकुहेटिगेवर (Dilhara Lokuhettige) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 8 वर्षांसाठी बंदी घातली आहे. आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक न्यायाधिकरणाने भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल श्रीलंकेचा 40 वर्षीय खेळाडू दिलहारा दोषी ठरला आहे. दिलहाराने आयसीसी कोड 2.1.1, 2.1.4 आणि 2.4.4 चे उल्लंघन केल्याबद्दल तो दोषी आढळला आहे. आयसीसीच्या या कारवाईनंतर आता कोणतेही क्रिकेटपटू खेळा्च्या प्रतिमेला धक्का पोहोचावणार नाहीत, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
"आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिलहाराने श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले होते. पण त्यानंतर त्याने भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केले आहे. दिलहारा यावेळी माहिती होते की, आपण नियमांचे उल्लंघन करत आहोत. पण तरीही तो ही गोष्ट करत गेला, असे आयसीसीचे अधिकारी एलेक्स मार्शल यांनी सांगितले. तसेच या कारवाईमुळे यापुढे कोणताही खेळाडू अशी चुकीची गोष्ट करायला धजावणार नाही, असे ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- CSK Vs RR, 12 Match Report: चेन्नई सुपर किंग्ज संघाचा दणदणीत विजय; राजस्थान रॉयल्सवर 45 धावांनी केली मात
ट्वीट-
आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बंदी येणारा लोकुहेतेगे पहिला माजी क्रिकेटपटू नाही. आयसीसीने काहीदिवसांपूर्वीच झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक हिथ स्ट्रिकवरही 8 वर्षांची बंदी घातली आहे.