Global T20 लीगदरम्यान पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने उमर अकमल याला दिली Match-Fixing ची ऑफर, PCB चा हस्तक्षेप करण्यास नकार
पाकिस्तान संघाचा मधल्या फळीतील फलंदाज उमर अकमलने सध्या सुरू असलेल्या ग्लोबल टी-20 कॅनडा 2019 मध्ये त्याला मॅच फिक्सिंगची ऑफर देण्यात आल्याची माहिती दिली आहे. अकमल याने याबाबाद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे म्हणजे पीसीबीकडे तक्रार केली आहे. पण पीसीबीने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
पाकिस्तान (Pakistan) क्रिकेटवर पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगची बाब समोर आली आहे. पाकिस्तान संघाचा मधल्या फळीतील फलंदाज उमर अकमल (Umar Akmal) याने सध्या सुरू असलेल्या ग्लोबल टी-20 कॅनडा 2019 मध्ये त्याला मॅच फिक्सिंगची ऑफर देण्यात आल्याची माहिती दिली आहे. अकमल याने याबाबाद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे म्हणजे पीसीबीकडे (PCB) तक्रार केली आहे. पण महत्वाचे म्हणजे त्यांच्या देशातील दोन खेळाडूंचा यामध्ये समावेश असूनही पीसीबीने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. (बकरी-ईदच्या अगोदर कुर्बानी फोटोज शेअर करत सरफराज अहमद याने ओढवला चाहत्यांचा रोष, Netizens ने PETA कडे केली कारवाईची मागणी)
पाकिस्तानच्या ‘Tribune Pakistan’ या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार ही बाब काही दिवसांपूर्वी समोर आली आहे. कॅनडामध्ये सध्या ग्लोबल टी-20 लीग स्पर्धा सुरू आहे. आणि यात उमर अकमल देखील सहभागी आहे. तो जवळपास दोन वर्षे पाकिस्तान संघातून बाहेर राहिला आहे. त्याने पीसीबीकडे लेखी तक्रार केली ज्यात माजी सलामीवीर मन्सूर अख्तर यांच्या विरुद्ध ग्लोबल टी-20 लीगमधील सामना फिक्सिंगसाठी पैसे ऑफर करण्याचे आरोप केले आहेत. अकमलच्या म्हणण्यानुसार त्यांनी ही ऑफर नाकारली आणि आयसीसीकडे तक्रारही केली. आणि आयसीसीने उमरला संशयास्पद लोकांपासून दूर राहण्यास सांगितले आहे.
अख्तरने 1980 ते 1990 दरम्यान पाकिस्तानकडून 19 टेस्ट आणि 41 वनडे सामने सामने खेळले आहेत. सध्या तो अमेरिकेत राहतो आणि कॅनडा ग्लोबल टी-20 मध्ये विनिपेग या संघात सेवा देत आहे. दरम्यान, अकमलच्या आरोपावर मन्सूर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिवाय, पीसीबीने सांगितले की ही बाब कॅनडाची आहे आणि तेथील प्रशासनच यावर कारवाई करू शकते. 25 जुलैपासून सुरू झालेली ग्लोबल टी 20 लीग 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यात शाहिद आफ्रिदी, वहाब रियाज, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक आणि शादाब खान या पाकिस्तानी खेळाडूंच्या प्रमुख भूमिका आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)