पाकिस्तानचे माजी फलंदाज बासित अली यांनी केला खुलासा, इमरान खान यांच्यावर जावेद मियांदाद यांना टीममधून बाहेर काढण्याचा केला आरोप
एका खास मुलाखतीत पाकिस्तानकडून1993 ते 1996 दरम्यान खेळलेल्या बासित अलीने मियांदादच्या राष्ट्रीय संघातून वगळण्याशी संबंधित सर्व तपशील उघड केले आहेत. पाकिस्तानचे माजी फलंदाज जावेद मियांदादना अखेरचा वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी त्यांना तीन वर्षे पाकिस्तान क्रिकेट संघातून वगळण्यात आले होते.
पाकिस्तानचे (Pakistan) माजी फलंदाज जावेद मियांदाद (Javed Miandad) 90 च्या दशकात कठोर-फटकेबाजी आणि फलंदाजीसाठी ओळखले जायचे. आपल्या राष्ट्रीय संघाकडून खेळताना त्याने फलंदाजीची गतिशीलता बदलली. शिवाय, पाकिस्तानकडून खेळलेला ते आजवरचे सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. तरीही 1996 मध्ये अखेरचा वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी त्यांना तीन वर्षे पाकिस्तान क्रिकेट संघातून वगळण्यात आले होते. या मागील कारण चाहत्यांना अजूनही माहिती नव्हते. पण आता एका खास मुलाखतीत पाकिस्तानकडून 1993 ते 1996 दरम्यान खेळलेल्या बासित अलीने (Basit Ali) मियांदादच्या राष्ट्रीय संघातून वगळण्याशी संबंधित सर्व तपशील उघड केले आहेत. 1992 मध्ये पाकिस्तानने इमरान खानच्या (Imran Khan) नेतृत्वात त्यांची पहिली विश्वचषक ट्रॉफी जिंकली. तोपर्यंत त्यांनी जागतिक स्तरावर अष्टपैलू खेळाडूची ख्याती मिळविली होती. दुसरीकडे, मियांदादने यापूर्वीच पाकिस्तानकडून पाच विश्वचषक खेळले होते. (Coronavirus: पाकिस्तानचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटर जफर सरफराज यांचे निधन, देशात संक्रमितांची संख्या पाच हजार पार)
एका खास मुलाखतीत बासित अली काही आश्चर्यकारक खुलासा केला ज्यामुळे प्रत्येक चाहत्यांना धक्का बसेल. ते म्हणाले की, 1993 मध्ये मियांदाद यांना परत हटवण्यासाठी संघात षडयंत्र रचण्यात आले होते आणि त्यांचा मोहरा म्हणून वापरण्यात आला होता. टाईम्स ऑफ इंडियाशी झालेल्या संभाषणादरम्यान ते म्हणाले की, “मियांदाद यांना हद्दपार करण्याचा कट रचला गेला. म्हणूनच माझी नेहमीच मियांदादशी तुलना केली जाते. खरं म्हणजे मी मियांदादचा एक टक्कासुद्धा नव्हतो. मी संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायचो. त्यावेळी माझी सरासरी 55 च्या आसपास होती. मियांदाद काढून टाकल्यानंतर मला नंबर -6 वर खेळायला पाठवायचे. त्यावेळी वसीम अक्रम कर्णधार होता, परंतु मियांदादच्या हकालपट्टीला जबाबदार असणारा माणूसच ऑर्डर देत असे आणि ते इमरान खान होते.”
1993 मध्ये पाकिस्तान वसीम अकरमच्या नेतृत्वात मॅनेजमेन्टने मियांदादची जागा बासित अली यांना दिली. त्यानंतर मियांदाद यांना राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी तब्बल तीन वर्ष लागली. दुसरीकडे, बासित अलीने पाकिस्तानकडून 1993 ते 1996 या काळात 50 वनडे आणि 19 कसोटी सामने खेळले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)