शिखर धवन याच्याबद्दल निवड समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत यांनी केले मोठे विधान, टी-20 विश्वचषकसाठी टीम इंडियात 'गब्बर'च्या जागी केली 'या' फलंदाजांची निवड

भारतीय संघाचा सलामी फलंदाज शिखर धवन आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी धवनला भारतीय संघात स्थान मिळावे अशी त्यांची इच्छा नसल्याचे रविवारी भारतीय संघाचे माजी निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी सांगितले. श्रीकांत म्हणाले की केएल राहुलपेक्षा शिखरला प्राधान्य देणे ही योग्य निवड नाही.

श्रीकांत आणि शिखर धवन (Photo Credit: Facebook/Getty)

यंदा ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक (World Cup) होणार आहे. भारतीय संघाचा सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी धवनला भारतीय संघात स्थान मिळावे अशी त्यांची इच्छा नसल्याचे रविवारी भारतीय संघाचे माजी निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत (Srikkanth) यांनी सांगितले. श्रीकांत म्हणाले की केएल राहुल (KL Rahul) पेक्षा शिखरला प्राधान्य देणे ही योग्य निवड नाही. धवनने नुकतंच दुखापतीतून श्रीलंकाविरूद्ध टी-20 मालिकेत पुनरागमन केले आहे. धवनच्या दुखापतीनंतर राहुलला टीम इंडियामध्ये संधी मिळाली आणि त्याने संधीचा पूर्ण फायदा घेतला. श्रीकांत म्हणले की, जर ते सध्या भारतीय क्रिकेट टीम निवड समितीचे अध्यक्ष असते तर त्यांनी आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी धवनची निवड केली नसती आणि स्पर्धेसाठी धवनऐवजी राहुलला संघात ठेवू इच्छित असल्याचे श्रीकांतने रविवारी सांगितले. (T20 World Cup 2020 : 'हे' 6 संघ विश्वचषक स्पर्धेसाठी ठरले पात्र)

धवनने दीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. त्याच्या अनुपस्थितीत, राहुल मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामी फलंदाजाच्या स्थानासाठी प्रबळ दावेदार म्हणून उदयास आला आहे. श्रीकांतने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, “श्रीलंके (Sri Lanka) विरुद्ध धावा काही फरक पडत नाही. मी निवड समितीचा अध्यक्ष असतो तर मी टी -20 वर्ल्ड कपसाठी धवनची निवड केली नसती. त्याच्यात आणि राहुलमध्ये कोणतीही स्पर्धा नाही." धवनच्या अनुपस्थितीत राहुलने रोहित शर्मासह वेस्ट इंडिजविरुद्ध भारताच्या डावाची सुरुवात करत आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले.

भारतीय संघ यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक खेळणार आहे. विश्वचषकपूर्वी टीम इंडियाला 15 टी-20 सामने खेळायचे आहेत. दरम्यान, धवनने मागील काही काळात क्रॅब प्रदर्शन केले आहार. त्याने टी-20 मध्ये अखेरच्या 12 डावात 110.56 च्या स्ट्राईक रेटने फक्त 272 धावा केल्या, तर राहुलने 9 डावात 142.40 च्या आकर्षक स्ट्राइक रेटने 356 धावा केल्या आहेत. टी -20 विश्वचषकपूर्वी भारतीय संघाला अनेक टी-20 सामने खेळायचे आहेत आणि धवन संघात स्थान मिळवण्यात यशस्वी होईल की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.