India Women's Team: माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूचे मोठे विधान, 4 वर्षात महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारत गाजवणार वर्चस्व

इंग्लंडने भारताला फॉलोऑन खेळण्यास भाग पाडल्यानंतर स्नेह राणा आणि तानिया भाटिया यांनी नवव्या विकेटच्या 31 ओव्हर फलंदाजी केली.

भारत महिला क्रिकेट संघ (Photo Credit: Twitter/BCCIWomen)

इंग्लंडविरुद्ध (England Women) कसोटी सामन्यात भारताची कामगिरी पाहता महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे (India) वर्चस्व गाजवण्याची क्षमता आहे असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉग (Brad Hogg) यांनी व्यक्त केले. “माझ्या मते भारताच्या महिला विलक्षण होत्या. कसोटी सामना त्यांनी ज्या प्रकारे वाचवला, त्या शेवटपर्यंत त्यांच्यात लढा देत होत्या. या संदर्भात त्यांना फारसा अनुभव नाही जसा इंग्लंडकडे आहे. ते खुणा सोडत नाहीत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध  (Australia) त्यांच्या सामन्याकडे खरोखरच आशेने पाहत आहे,” हॉगने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. नोव्हेंबर 2014 नंतर म्हणजे तब्बल सात वर्षांत वर्षांत महिला संघाचा हा पहिला कसोटी सामना होता. (IND W vs ENG W Test 2021: शेफाली वर्मा, स्नेह राणा यांची ऐतिहासिक कामगिरी, भारत-इंग्लंड कसोटी सामना ड्रॉ)

इंग्लंडने भारताला फॉलोऑन खेळण्यास भाग पाडल्यानंतर स्नेह राणा (Sneh Rana) आणि तानिया भाटिया (Taniya Bhatia) यांनी नवव्या विकेटच्या 31 ओव्हर फलंदाजी केली. दोन्ही खेळाडूंचे कसोटी पदार्पण असताना राणाने 154 चेंडूत 80 धावांवर नाबाद राहिली तर भाटियाने 88 चेंडूत 44 धावा केल्या. दोघांमध्ये 104 धावांची भागीदारी झाली. “आत्ताच्या तरूण खेळाडू येत असताना मी पुरूष संघाप्रमाणे प्रभुत्व मिळवण्यापूर्वी त्यांना चार वर्षे देईन. चार वर्षांच्या कालावधीत पराभूत करणारा ते संघ बनू शकतात आणि ऑस्ट्रेलियाला या सामन्यातून बाहेर खेचू शकतील,” त्यांनी पुढे म्हटले. इतकंच नाही तर हॉग म्हणाले की महिलांचा कसोटी पाच दिवस चालायला हवा आणि मालिकेत एकापेक्षा जास्त सामने असावेत.

ब्रिस्टल येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळलेला एकमेव कसोटी सामना अनिर्णित राहिला. स्नेह राणा आणि तानिया भाटिया यांनी 9व्या विकेटसाठी विक्रमी भागीदारीच्या जोरावर संघाला सामना अनिर्णित करण्यात महत्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या डावात एका क्षणी भारतीय संघ 7 गडी गमावून 199 धावा करून संघर्ष करत होता. येथून संघ सामना हरताना दिसत होता परंतु राणाने आपल्या शानदार कामगिरीमुळे संघाला पराभवापासून वाचवले. स्नेह राणाने नाबाद 80 धावा केल्या. तसेच यापूर्वी गोलंदाजीत देखील राणाने 4 विकेट्स घेतल्या होत्या.