IPL 2024: पाच परदेशी खेळाडू जे आयपीएल 2024 मध्ये करतील पदार्पण, जाणून कोण आहे ते

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (CSK vs RCB) आमने-सामने असती. या हंगामात काही भारतीय आणि परदेशी खेळाडू देखील चर्चेत असतील.

IPL 2024 (Photo Credit - X)

IPL 2024: जसजसा प्रत्येक दिवस जात आहे, तसतशी आयपीएल 2024 ची प्रतीक्षा क्रिकेट चाहत्यांच्या मनात उत्साह निर्माण करत आहे. 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या आवृत्तीला सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (CSK vs RCB) आमने-सामने असती. या हंगामात काही भारतीय आणि परदेशी खेळाडू देखील चर्चेत असतील. चला तर मग त्या पाच परदेशी खेळाडूंबद्दल बोलू जे यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहेत. (हे देखील वाचा: How To Watch IPL 2024 Live Streaming: आयपीएलच्या 17व्या हंगामाला 22 मार्चपासून होणार सुरुवात, पहिल्या सामन्यात CSK vs RCB आमने-सामने; येथे पाहा लाइव्ह)

जेराल्ड कोएत्झी

आयपीएल 2024 च्या लिलावात जेराल्ड कोएत्झीला गुजरात टायटन्सने ₹ 5 कोटींमध्ये विकत घेतले. या वेगवान गोलंदाजाने दक्षिण आफ्रिकेसाठी चार टी-20 सामने खेळले असून त्यात त्याने सहा विकेट घेतल्या आहेत. कोएत्झीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 18 विकेट्स घेऊन चमकदार कामगिरी केली होती.

रचिन रवींद्र

आगामी हंगामात रचिन रवींद्र आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतो. महान कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी त्याला आहे. रवींद्रला सीएसकेने 1.8 कोटी रुपयांना करारबद्ध केले. रचिन रवींद्र न्युझीलंडचा स्फोटक फलंदांज आहे. तो तिन्ही फाॅरमटमध्ये खेळतो.

दिलशान मधुशंका

आयपीएल 2024 च्या लिलावात श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका याला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्सने 4.6 कोटी रुपये दिले. डावखुरा वेगवान गोलंदाज त्यांच्या बॉलिंग लाइनअपमध्ये खोलवर भर घालेल.

अजमतुल्ला उमरझाई

अजमतुल्ला उमरझाईला आयपीएल 2024 च्या लिलावात गुजरात टायटन्सने 50 लाख रुपयांना विकत घेतले. एकदिवसीय विश्वचषकात उजव्या हाताच्या फलंदाजाने आठ डावात तीन अर्धशतकांसह 353 धावा केल्या, 70.60 च्या सरासरीने आणि 97.78 च्या स्ट्राइक रेटने.

शामर जोसेफ

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी पदार्पणात शमर जोसेफने सर्वांना प्रभावित केले. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या. मार्क वुडच्या जागी जोसेफ एलएसजीमध्ये सामील झाला.



संबंधित बातम्या

SA vs PAK 2nd Test, Capetown Pitch Report And Stats: दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी न्यूलँड्सच्या आकडेवारीवर नजर टाका; खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू कोण?

AUS vs IND 5th Test, Sydney Pitch Report And Stats: ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया यांच्यातील सामन्यापूर्वी सिडनी क्रिकेट ग्राउंडची आकडेवारी पहा; खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू कोण

South Africa vs Pakistan 2nd Test 2025 Live Streaming: दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानला पराभूत करून दक्षिण आफ्रिकेचे मालिका काबीज करण्याचे उद्दिष्ट; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या

Australia vs India 5th Test 2025 Live Streaming: ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिकेत बरोबरी करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न; भारतात सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? घ्या जाणून