IND vs SL 1st T20 Playing XI: मंगळवारी खेळवला जाणार पहिला टी-20 सामना, जाणून घ्या कशी असु शकते टीम इंडियाची प्लेइंग 11
7 वेळा भारतीय संघाने मालिका जिंकली, तर 1 वेळा ती अनिर्णित राहिली.
IND vs SL 1st T20: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात टी-20 मालिकेतील पहिला सामना मंगळवार, 3 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे असेल. वानखेडे येथे होणाऱ्या या सामन्याच्या प्लेइंग 11 (IND vs SL Playing 11) मध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते ते जाणून घेऊया. भारताचा श्रीलंकेविरुद्धचा रेकॉर्ड खूप चांगला आहे, याआधी खेळलेल्या एकूण 9 मालिकांमध्ये श्रीलंकेने फक्त एकदाच विजय मिळवला आहे. 7 वेळा भारतीय संघाने मालिका जिंकली, तर 1 वेळा ती अनिर्णित राहिली. यावेळी भारतासमोर अनेक आव्हाने असतील आणि संघ श्रीलंकेला अजिबात हलक्यात घेणार नाही.
श्रीलंकेचा क्रिकेट संघ आशिया चषकाचा विजेता आहे आणि अलीकडेच भारताने बांगलादेशकडून एकदिवसीय मालिका गमावली. या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजासारखे खेळाडू नसल्याने हार्दिक पांड्यासमोर अनेक आव्हाने असतील. शिवम मावी, मुकेश कुमार यांचा या संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र पहिल्या सामन्यात या दोघांपैकी एकाला संधी देणे कठीण आहे. (हे देखील वाचा: Gautam Gambhir On Prithvi Shaw: गौतम गंभीरने पृथ्वी शॉबद्दल केले वक्तव्य, संघात निवड न झाल्याबद्दल सांगितली ही गोष्टी)
शुभमन गिल आणि इशान किशन यांचा सलामीची जोडी म्हणून समावेश केला जाईल. इशान किशन आणि संजू सॅमसन या दोन्ही यष्टीरक्षकांचा पहिल्या सामन्याच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. पाच गोलंदाज म्हणून, हार्दिक पांड्या 2 फिरकीपटू आणि 3 वेगवान गोलंदाजांसह जाऊ शकतो. हर्षल पटेल फिरकी गोलंदाज म्हणून युझवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंह, उमरान मलिकसह खेळू शकतो.
भारताची संभाव्य प्लेईंग 11
ईशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक