‘Bloody Indians म्हणणारे  आज IPL मुळे तळवे चाटत आहे’, इंग्लंडच्या वर्णद्वेषी प्रकरणावर माजी क्रिकेटर Farokh Engineer यांचे धक्कादायक बोल

इंजिनियर म्हणाले की त्यांना देखील इंग्लंडमध्ये वर्णद्वेषी टिप्पणींना सामोरे जावे लागले होते. तथापि, 2008 मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून इंग्लिश क्रिकेटपटू आता पैशासाठी आपले बूट चाटत असल्याचे इंजिनियर म्हणाले.

फारुख इंजिनियर (Photo Credit: Facebook)

वर्णद्वेषाबद्दल (Racism) आपल्या सर्वांना चांगले माहिती आहे आणि हे जगभर पसरलेले आहे. खेळांमधेही वर्णद्वेष आहे आणि क्रिकेट त्याला अपवाद नाही. इंग्लंड क्रिकेटपटूंच्या सोशल मीडियावर विवादास्पद वर्णद्वेषी टिप्पणी प्रकरणात भारताचे माजी विकेटकीपर-फलंदाज फारूख इंजिनियर (Farokh Engineer) यांनी मोठा खुलासा केला आहे. इंजिनियर म्हणाले की त्यांना देखील इंग्लंडमध्ये वर्णद्वेषी (Racism in England) टिप्पणींना सामोरे जावे लागले होते. भारताचे माजी यष्टिरक्षक इंजिनियर यांनी आपल्या खेळण्याच्या काळात इंग्लंडमध्ये (England) वर्णद्वेषाचा सामना केल्याच्या आठवणींना उजाळा दिला आणि इंग्लिश काऊन्टीमध्ये लंकाशायरकडून (Lancashire) खेळलेल्या माजी विकेटकीपरने सांगितले की, ते अनेकदा इंग्रजी खेळाडूंकडून वर्णद्वेषाच्या टिप्पण्या ऐकायचे जे त्यांचा उच्चार ऐकून त्याची चेष्टा करत असत किंवा तो भारतीय असल्याने त्याची खिल्ली उडवायचे. (Eoin Morgan आणि Jos Buttler यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, ‘त्या’ व्हायरल Tweets वर ECB ने दिले चौकशीचे आदेश)

इंजिनियर 1960 च्या दशकाच्या सुरूवातीला लंकाशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळायचे. त्यांनी म्हटले की जेव्हा जे पहिल्यांदा जेहवा क्लबमध्ये आले तेव्हा त्यांना काही प्रसंगी वर्णद्वेषाचा सामना करावा लागला परंतु इंग्रजी भाषेचा जाणकार व भाषेचा अडथळा नसल्यामुळे त्यांनी चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. “जेव्हा मी पहिल्यांदा काउंटी क्रिकेटमध्ये आलो तेव्हा ‘तो भारताचा आहे का?’ अशी प्रश्नचिन्हे निर्माण झाली होती. जेव्हा मी लंकाशायरमध्ये सामील झालो तेव्हा एकदा किंवा दोनदा मला (वर्णद्वेषी टिप्पण्या) सामोरे जावे लागले. फारसे वैयक्तिक नाही, परंतु मी फक्त भारतातून आलो म्हणून. माझ्या उच्चारणची थट्टा करण्याचा त्यांचा मूळ हेतू होता,” इंजिनियरने इंडियन एक्सप्रेसला सांगितले. “मला वाटते की बर्‍याच इंग्रजांपेक्षा माझे इंग्रजी खरोखरच चांगले आहे, म्हणून लवकरच त्यांना समजले की आपण फारूख इंजिनियरांसोबत पंगा नाही घ्यायचा. त्यांना मेसेज मिळाला होता. मी लगेच त्यांना प्रत्युत्तर दिले. इतकंच नाही तर मी स्वतःला बॅट व ग्लोव्हसने सिद्ध केले. मला अभिमान होता की मी देशाचा राजदूत म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले,” त्यांनी पुढे म्हटले.

इंग्लंडचे माजी कर्णधार जेफ्री बॉयकॉट भारतीयांचा त्यावेळी ‘ब्लडी इंडियन्स’ म्हणून उल्लेख करायचे असे इंजिनीअरने म्हटले. तथापि, 2008 मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून इंग्लिश क्रिकेटपटूंच्या दृष्टिकोनात बदल झाला आहे, असे या माजी भारतीय क्रिकेटपटूने आवर्जून सांगितले. इंग्लंडचे खेळाडू आता आयपीएलमधील पैशासाठी आपले बूट चाटत असल्याचे इंजिनियर म्हणाले. “काही वर्षापूर्वीपर्यंत आम्ही सर्वच त्यांच्यासाठी‘ब्लडी इंडियन्स’ होतो. आता एकदा आयपीएल सुरू झाल्यानंतर ते सर्व आपले तळवे चाटत आहेत. केवळ पैशामुळे ते आता असं करत आहे. पण माझ्यासारख्या लोकांना ज्यांनी सुरुवातीला त्यांचे खरा रंग काय आहे हे माहित आहे. आता त्यांनी अचानक त्यांचे सूर बदलले,” कॉमेडियन सायरस ब्रोचासोबतच्या पोडकास्ट दरम्यान माजी यष्टिरक्षक फलंदाज म्हणाले.