IND vs AUS Test, ODI Series 2023 Schedule: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमांचक सामन्यांना 9 फेब्रुवारीपासून होणार सुरुवात, बघून घ्या कसोटी आणि वनडे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
यावर्षी टीम इंडियाने वनडे (ODI) आणि टी-20 (T20) मॅचमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे (Border-Gavaskar Trophy) काउंटडाऊन सुरू झाले आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपुरात (Nagpur) खेळवला जाणार असून, त्यासाठी एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. यावर्षी टीम इंडियाने वनडे (ODI) आणि टी-20 (T20) मॅचमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिल्यांदा न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आणि वनडेनंतर श्रीलंकेविरुद्ध व्हाईट वॉश आणि टी-20 मालिका जिंकली. पण आता खऱ्या क्रिकेटची म्हणजेच कसोटीची पाळी आहे, जिथे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. या दौऱ्यात चार कसोटी सामन्यांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपुरात खेळवला जाईल. त्याच वेळी, दुसरा कसोटी सामना 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत, तिसरा कसोटी सामना 1 मार्च ते 5 मार्च दरम्यान धर्मशालामध्ये आणि चौथा कसोटी सामना 9 मार्च ते 13 मार्च दरम्यान अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. (हे देखील वाचा: IND vs AUS Test Series 2023: आर अश्विन कसोटीतील 'हा' अनोखा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ, अनिल कुंबळेला मागे टाकून रचणार इतिहास)
कसोटी मालिका
पहिली कसोटी - 9 ते 13 फेब्रुवारी - विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर
दुसरी कसोटी - 17 ते 21 फेब्रुवारी - अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
तिसरी कसोटी - 1 ते 5 मार्च - हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला
चौथी कसोटी - 9 ते 13 मार्च - नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
कसोटी मालिकेनंतर होणार वनडे मालिका
कसोटी मालिकेव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळणार आहे, जी 17 मार्चपासून सुरू होणार आहे. 2023 हे वर्ष एकदिवसीय विश्वचषकाचे वर्ष आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची मानली जात आहे. यावर्षी टीम इंडियाने एकदिवसीय सामन्यात श्रीलंका आणि न्यूझीलंडला पराभूत करून शानदार सुरुवात केली आहे. सर्व कसोटी सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू होतील, तर एकदिवसीय सामने दुपारी 2 वाजता सुरू होतील.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे वेळापत्रक
पहिला वनडे - 17 मार्च, वानखेडे स्टेडियम, मुंबई
दुसरा वनडे - 19 मार्च, विशाखापट्टणम
तिसरा वनडे - 22 मार्च, एमए चिदंबरम स्टेडियम, पुणे