European Cricket स्पर्धेच्या टी-10 सामन्यात ‘या’ फलंदाजाचा दे दनादन! 28 बॉलमध्ये शतक आणि 10 ओव्हरमध्ये उभारला धावांचा एवरेस्ट

सोमवारी टी-10 खेळाच्या इतिहासात युरोपियन क्रिकेट मालिकेत नवीन विक्रम नोंदवला गेला. सलामीवीर अहमद मुसद्दीकने 28 चेंडूंचा सामना करत युरोपियन क्रिकेट मालिकेच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम नोंदवला. 32 वर्षीय खेळाडूने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला आणि 33 चेंडूत 115 धावा फटकावल्या.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सोमवारी टी-10 खेळाच्या इतिहासात युरोपियन क्रिकेट मालिकेत European Cricket Series) नवीन विक्रम नोंदवला गेला. सलामीवीर अहमद मुसद्दीकने (Ahmed Musaddiq) 28 चेंडूंचा सामना करत युरोपियन क्रिकेट मालिकेच्या (ECS) इतिहासातील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम नोंदवला. तो शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला आणि डावाच्या शेवटच्या चेंडूवर मोठा शॉट ठोकण्याच्या प्रयत्नात आऊट होऊन बाहेर पडला. Kummerfelder खेळणाऱ्या अहमद मुसद्दिकने THCC Hamburg विरुद्ध खेळून हा पराक्रम केला आहे. मुसद्दिकने युरोपियन क्रिकेट मालिकेच्या इतिहासात 28 बॉलमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम करून सर्वात वेगवान शतक झळकवणारा खेळाडू  ठरला आणि भारतीय वंशाचा फलंदाज गोहर मननचा (Gohar Manan) विक्रम मोडला. गौराजने यापूर्वी क्लूज क्रिकेट क्लब विरुद्ध 29 बॉलमध्ये वेगवान टी-10 शतक ठोकण्याचा पराक्रम केला होता.

32 वर्षीय खेळाडूने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला आणि 33 चेंडूत 115 धावा फटकावल्या आणि दहा ओव्हरमध्ये आपल्या संघाला 198/2 धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. मुसाद्दिक 7 चौकार आणि 13 षटकार ठोकत 106 धावा 20 चेंडूमध्ये केल्या. मुसाद्दिकच्या फलंदाजीसमोर विरुद्ध टीमच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. अभिनंदन झा याच्या गोलंदाजी वर त्याने 26 धावा काढल्या. वेगवान गोलंदाज असो किंवा फिरकीपटू त्याने आपल्या आक्रमक बॅटिंगने गोलंदाजांना धु...धू.. धुतलं. पाचवी ओव्हर अहमद मुसद्दीकच्या विशेष खेळीचे मुख्य आकर्षण ठरले जेव्हा त्याने बहराम अलीला सलग चार षटकार लगावत केवळ 13 चेंडूत अर्धशतक ठोकले.

यानंतर, 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारीनंतर आपल्या साथीदाराची विकेट गमावल्यावरही तो थांबला नाही आणि THCC Hamburg गोलंदाजांवर हल्लाबोल सुरूच ठेवला. आपल्या 28 बॉल शतकासह अहमद मुसद्दिक आता ECS इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. प्रत्युत्तरात 198 चा पाठलाग करताना THCC Hamburg फलंदाजांनीही गुडघे टेकले. त्यांचे फक्त दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले आणि निर्धारित 10 ओव्हरमध्ये संघाला सात गडी राखून केवळ 53 धावा करता आल्या. अशा प्रकारे THCC ला 145 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now