England vs Australia 2nd ODI Live Streaming: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आज रंगणार वनडे मालिकेचा दुसरा सामना! कोण मारणार बाजी? कुठे पाहणार मॅच? इथे घ्या जाणून
तर नाणेफेक अर्धा तास आधी दुपारी 3 वाजता होईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला आहे.
ENG vs AUS 2nd ODI 2024: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (ENG vs AUS 2nd ODI) शनिवारी (21 सप्टेंबर 2024) होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर नाणेफेक अर्धा तास आधी दुपारी 3 वाजता होईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंड संघ दुसऱ्या वनडेत पुनरागमन करू इच्छितो.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
आम्ही तुम्हाला सांगतो की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका भारतातील टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे सोनी स्पोर्ट्स टेन 5 एसडी आणि सोनी स्पोर्ट्स टेन 5 एचडी चॅनेलवर थेट प्रसारित केली जाईल. याशिवाय, SonyLIV आणि FanCode ॲपवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. (हे देखील वाचा: Afghanistan vs South Africa 2nd ODI 2024 Highlights: अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे सामन्याचे एका क्लिकवर येथे पाहा हायलाइट्स)
पहिल्या सामन्याचा स्कोरकार्ड
पहिल्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकांत सर्वबाद 315 धावा केल्या. बेन डकेटने 104.39 च्या स्ट्राईक रेटने 91 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 95 धावा केल्या. मात्र, त्याचे शतक हुकले. त्याचवेळी विक जॅकनेही अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 44 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. ट्रॅव्हिस हेडने सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 129 चेंडूंचा सामना करत 20 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 154 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला.
इंग्लंड एकदिवसीय संघ
हॅरी ब्रूक (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स (विकेट-कीपर), बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट (विकेटकीपर), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ऑली स्टोन, रीस टोपली, जॉन टर्नर
ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ
मिचेल मार्श (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), कूपर कोनोली, बेन द्वारशिस, कॅमेरॉन ग्रीन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा