IND vs ENG 2020: BCCIला आणखी एक झटका, इंग्लंडचा सप्टेंबर महिन्यात होणार भारत दौरा 'या' कारणामुळे 2021 पर्यंत स्थगित होण्याची शक्यता

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार इंग्लंडचा भारत दौरा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे वृत्त सध्या समोर येत आहे. Daily Mailच्या वृत्तानुसार, बीसीसीआय सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएल आयोजित करण्याच्या विचारात असल्याने ईसीबी इंग्लंडचा भारत दौरा स्थगित करणार आहे.

भारत-इंग्लंड (Photo Credit: Getty)

विराट कोहलीच्या भारतीय संघाला (Indian Team) खेळताना पहाण्याची प्रतीक्षा आणखी लांबणीवर पडली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार इंग्लंडचा भारत दौरा (England Tour of India) पुढे ढकलण्यात येणार असल्याचे वृत्त सध्या समोर येत आहे. कोरोना व्हायरसने सर्व जगभरातील क्रीडा वेळापत्रकात बदल करण्यासाठी भाग पडले आहे. प्रमुख युरोपियन फुटबॉल लीगने नेहमीच्या टाइमलाइनच्या पलीकडे त्यांचा हंगाम वाढविला आहे, तरीही कोविडमधून आपला मार्ग शोधण्यासाठी क्रिकेट मंडळं अजूनही प्रयत्नशील आहेत. वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसह इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू करणारा बोर्ड ठरला, परंतु त्यांचा भारत दौरा ठरल्याप्रमाणे पुढे जाणे अपेक्षित नाही. Daily Mailच्या वृत्तानुसार, बीसीसीआय सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इंडियन प्रीमियर लीग (IPL) आयोजित करण्याच्या विचारात असल्याने ईसीबी इंग्लंडचा भारत दौरा स्थगित करणार आहे. (Pakistan Tour of England: फाईव्ह-स्टार हॉटेल नाही इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी खेळाडूंवर आर्थिक संकटामुळे लॉजवर राहण्याची वेळ, तुम्हीच पाहा)

इंग्लंडच्या भारत दौऱ्यावर 3 वनडे आणि 3 टी-20 मालिका खेळणार आहे. पहिला सामना 16 सप्टेंबर रोजी खेळला जाईल, पण कोविड-19 दरम्यान निर्माण झालेल्या गर्दीमुळे द्विपक्षीय मालिका पुढे ढकलण्यात येणार आहे. दुसरीकडे, यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचा निर्णय या महिन्यात अपेक्षित असल्याने बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबर विंडोमध्ये आयपीएलची 13 वी आवृत्ती आयोजित करण्याचा विचार करेल. टी-20 लीगमध्ये भारतीय खेळाडूंचा आपापल्या फ्रँचायझींचा ताबा असला तरी सरकारकडून मंजुरी मिळाल्यास इंग्रजी खेळाडूंचेही टी-20 स्पर्धेत भाग घेण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, मार्च महिन्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरू झाल्यापासून भारतात कोणतीही क्रिकेट मालिका खेळली गेली नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यापूर्वी यंदा आयपीएल होस्ट करणे हे बोर्डचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचीपुष्टी केली होती. भारतातील सध्याची कोविड-19 परिस्थिती जशी आहे तशी तणावपूर्ण आहे. जवळजवळ प्रत्येक दिवस, प्रकरणांमध्ये विक्रमी वाढ होत आहे. आणि परिस्थिती अशी आहे की बीसीसीआय श्रीलंका किंवा युएईसारख्या देशांमध्ये देखील आयपीएलचे आयोजन करण्यास तयार आहे. बीसीसीआयने संपूर्ण आयपीएल 13 चे आयोजन करण्यासाठी परदेशातील खेळाडूंवरील प्रवासावरील निर्बंध हटविणे आवश्यक आहे. सध्या देशांतर्गत उड्डाणे सुरू आहेत पण आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. हे निर्बंध मात्र येत्या काही आठवड्यांतच हटविले जाण्याची अपेक्षा आहे.