England Squad Test Tour of New Zealand: पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर इंग्लंडने आगामी मालिकेसाठी संघाची केली घोषणा, स्टार खेळाडू बाहेर

यानंतर 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा आहे. अलीकडेच पाकिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडला 1-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. पण आता संघ आगामी कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे.

ENG Team (photo Credit - X)

ENG vs NZ Test Series 2024: इंग्लंड क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना 28 नोव्हेंबरपासून होणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपला संघ जाहीर केला आहे. अनेक खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे, तर अनेक खेळाडू बाद झाले आहेत. इंग्लंडला न्यूझीलंडपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध पांढऱ्या चेंडूंची मालिका खेळायची आहे. यानंतर 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा आहे. अलीकडेच पाकिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडला 1-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. पण आता संघ आगामी कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे.

बेन स्टोक्स कर्णधारपदाची धुरा सांभाळणार 

बोर्डाने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत बेन स्टोक्सला कर्णधार बनवले आहे. स्टोक्सने अलीकडेच पाकिस्तानविरुद्ध कर्णधारपद भूषवले होते. मात्र त्यांना मालिका गमवावी लागली. जेमी स्मिथची न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड झालेली नाही. पाकिस्तानविरुद्ध नुकत्याच झालेल्या इंग्लंड संघाचा तो भाग होता. (हे देखील वाचा: IND vs NZ 2nd Test 2024: भारतामध्ये 'या' परदेशी संघांनी जिंकल्या आहेत कसोटी मालिका, यादीत पाकिस्तानचाही समावेश)

जेकब बेथेलला मिळाली संधी 

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू जेकब बेथेलचा प्रथमच कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये तो सातत्याने चांगली कामगिरी करत होता. जेकबने इंग्लंडकडून 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 85 धावा आणि 4 विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय 2 टी-20 सामन्यात त्याने 46 धावा केल्या आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाटी इंग्लंडचा संघ

बेन स्टोक्स, रेहान अहमद, गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्से-जॉर्डन, कॉक्स जॅक क्रॉली, बेन डकेट, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स.