'विराट कोहलीपेक्षा बाबर आजम चांगला फलंदाज', इंग्लंडचा फिरकीपटू आदिल राशिदने वर्ल्ड XI मध्ये इयन मॉर्गनला बनवले कर्णधार

मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी रशीदने विराट कोहलीच्या तुलनेत बाबरला निवडले आणि म्हटले की त्याची निवड सध्याच्या फॉर्मवर आधारित आहे. इंग्लंडचा पहिला वर्ल्ड कप विजेता कर्णधारइयन मॉर्गनला रशीदने कर्णधारपदाची जबाबदारी दिली.

इंग्लंडचा फिरकीपटू आदिल राशिद (Photo Credit: Getty)

जगभरात पसरलेल्या कोरोना साथीमुळे, खेळाचे सर्व उपक्रम थांबले आहेत. दरम्यान, बरेच खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले म्हणणे चाहत्यांसमोर मांडत आहेत. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीदने (Adil Rashid) आपल्या आवडत्या वर्ल्ड इलेव्हनची घोषणा केली आहे. तथापि, त्याने कोणत्या आधारावर टीम बनवली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दोघेही 'जागतिक दर्जाचे फलंदाज' आहेत असे सांगून भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तानी बाबर आजम (Babar Azam) यांची तुलना करणे कठीण असल्याचे रशीदने सांगितले. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी रशीदने विराट कोहलीच्या तुलनेत बाबरला निवडले आणि म्हटले की त्याची निवड सध्याच्या फॉर्मवर आधारित आहे. इंग्लंडचा पहिला वर्ल्ड कप विजेता कर्णधारइयन मॉर्गनला रशीदने कर्णधारपदाची जबाबदारी दिली. याशिवाय त्याने भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियन सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरची संघात सलामी जोडी म्हणून निवड केली. (डेविड वॉर्नर याने सांगितला विराट कोहली-स्टिव्ह स्मिथ मधील फरक; भारतीय कर्णधाराशी तुलना करत केले 'हे' मोठे विधान)

या संघात राशिदने भारतीय कर्णधार विराट, बाबर आणि मॉर्गनला मधल्या फळीत ठेवले आहे. सध्याच्या काळात मर्यादित षटकांची कामगिरी पाहिल्यास बाबरने विराटपेक्षा चांगली कामगिरी केली असल्याने त्यामुळे मी बाबरला कोहलीपेक्षा चांगला फलंदाज मानतो, असं राशिद म्हणाला. राशिदने आपला सहकारी जोस बटलरला संघात यष्टिरक्षक म्हणून निवडला आहे. रशीदने या इलेव्हनयामध्ये फक्त दोन भारतीय खेळाडूंची निवड केली. अष्टपैलू म्हणून त्याने बेन स्टोक्सला संधी दिली. राशिदने आपल्या संघात तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली, ज्यात आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि किवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांचा समावेश आहे. याशिवाय संघात त्याने फक्त एक फिरकीपटू इमरान ताहिरला निवडले आहे.

आदिल रशीदने निवडलेला संघ पुढीलप्रमाणे आहे.

रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, विराट कोहली, बाबर आजम, इयन मोर्गन (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, इमरान ताहिर, ट्रेंट बोल्ट आणि कगिसो रबाडा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif