England Beat Sri Lanka, 2nd Test Day 4 Scorecard: इंग्लडंकडून 'लंका'दहन, दुसऱ्या कसोटीत मिळवला 190 धावांनी विजय; मालिकेत घेतली 2-0 अशी आघाडी
या सामन्यात इंग्लंड संघाने श्रीलंकेचा 190 धावांनी पराभव केला आहे. यासह इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
England National Cricket Team Beat Sri Lanka National Cricket Team 2nd Test Day 4 Scorecard: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket Team) यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंड संघाने श्रीलंकेचा 190 धावांनी पराभव केला आहे. यासह इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि इंग्लंडचा निम्मा संघ अवघ्या 193 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर जो रूटने इंग्लंडचा डाव सांभाळला.
इंग्लंडचा पहिला डाव 102 षटकात 427 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून जो रूटने 167 चेंडूंमध्ये 13 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. जो रूटच्या कसोटी कारकिर्दीतील हे 33 वे शतक आहे. इंग्लंडकडून जो रूटने 143 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. जो रूटच्या गस ऍटकिन्सनने 118 धावा केल्या. या खेळीदरम्यान, गस ऍटकिन्सनने 115 चेंडूत चार षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने आपले पहिले कसोटी शतक झळकावले.
श्रीलंकेकडून असिथा फर्नांडोने सर्वाधिक 5 बळी घेतले. असिथा फर्नांडोशिवाय मिलन प्रियनाथ रथनायके आणि लाहिरू कुमाराने प्रत्येकी दोन बळी घेतले. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ 55.3 षटकात केवळ 196 धावा करू शकला नाही. श्रीलंकेकडून कामिंडू मेंडिसने सर्वाधिक 74 धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स, मॅथ्यू पॉट्स, गस ऍटकिन्सन आणि ऑली स्टोन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 54.3 षटकात 251 धावा करत सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात अनुभवी फलंदाज जो रूटने इंग्लंडकडून 103 धावांची शानदार खेळी केली. जो रूटने 111 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने शतक झळकावले. जो रूटशिवाय हॅरी ब्रूकने 34 धावा केल्या. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो आणि लाहिरू कुमाराने प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. या दोघांशिवाय मिलन प्रियनाथ रथनायके आणि प्रभात जयसूर्या यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला 483 धावांची गरज होती.
लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात श्रीलंकेचा संपूर्ण संघ 86.4 षटकांत केवळ 292 धावांवरच गारद झाला. श्रीलंकेसाठी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश चंडिमलने सर्वाधिक 58 धावा केल्या. दिनेश चंडिमलशिवाय दिमुथ करुणारत्नेने 55 आणि धनंजय डी सिल्वाने 50 धावा केल्या. इंग्लंडकडून गस ऍटकिन्सनने सर्वाधिक 5 बळी घेतले. गस ऍटकिन्सनशिवाय ऑली स्टोन आणि ख्रिस वोक्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 6 ते 10 सप्टेंबर दरम्यान लंडनच्या केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजेपासून खेळवला जाईल.