England Announce Playing XI For IND vs ENG 2nd T20I: इंग्लंडने टीम इंडियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी प्लेइंग इलेव्हनची केली घोषणा, ब्रायडन कार्सचा संघात समावेश

पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये गस अ‍ॅटकिन्सन खेळणार नाही. त्याच्या जागी ब्रायडन कार्सला संधी देण्यात आली आहे

IND vs ENG (Photo Credit - X)

India National Cricket Team vs England National Cricket Team, 2nd T20I 2025 Match:  भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (T20 Series)  दुसरा सामना शनिवारी म्हणजेच 25 जानेवारी रोजी खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईतील  (Chennai) एमए चिदंबरम स्टेडियमवर  (MA Chidambaram Stadium) खेळला जाईल. पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने प्रवेश करेल. तर, टीम इंडियाला मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे.  (हेही वाचा  -  Ranji Trophy 2025: 25 चौकार आणि 3 षटकारांसह, कर्नाटकच्या तरुण खेळाडूची आक्रमक खेळी, पंजाबविरुद्ध रणजीमध्ये झळकावले द्विशतक)

या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या (Jos Buttler)  खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)  करत आहे. दरम्यान, इंग्लंडने दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये गस अ‍ॅटकिन्सन खेळणार नाही. त्याच्या जागी ब्रायडन कार्सला संधी देण्यात आली आहे

पाहा पोस्ट -

दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन: बेन डकेट, फिल साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडेन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.

Share Now

Tags

India Squad Abhishek Sharma Sanju Samson Tilak Varma Suryakumar Yadav Hardik Pandya Rinku Singh Nitish Kumar Reddy Axar Patel Arshdeep Singh Mohammed Shami Varun Chakravarthy Washington Sundar Ravi Bishnoi Dhruv Jurel Harshit Rana England Squad Ben Duckett Philip Salt Jos Buttler Harry Brook Liam Livingstone Jacob Bethell Jamie Overton Gus Atkinson Jofra Archer Adil Rashid Mark Wood Saqib Mahmood Brydon Carse Jamie Smith Rehan Ahmed Indian National Cricket Team vs England Cricket Team IND vs ENG 2nd T20I 2025 MA Chidambaram Stadium Chennai Indian National Cricket Team England Cricket Team भारतीय संघ अभिषेक शर्मा संजू सॅमसन तिलक वर्मा सूर्यकुमार यादव हार्दिक पंड्या रिंकू सिंग नितीश कुमार रेड्डी अक्षर पटेल अर्शदीप सिंग मोहम्मद शमी वरुण चक्रवर्ती वॉशिंग्टन सुंदर रवी बिश्नोई ध्रुव जुरेल हर्षित राणा इंग्लंड संघ बेन डकेट फिलिप साल्ट जोस बटलर हॅरी ब्रूक लियाम लिव्हिंगस्टोन जेकब बेथेल जेमी ओव्हरटन गस अ‍ॅटकिन्सन जोफ्रा आर्चर आदिल रशीद मार्क वूड साकिब महमूद ब्रायडन कार्स जेमी स्मिथ रेहान अहमद एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ इंग्लंड क्रिकेट संघ india national cricket team vs england cricket team players
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement