ENG vs SL 2021: टी-20 मालिका गमावल्यावर श्रीलंकन खेळाडूंना झटका, या दोन क्रिकेटपटूंवर बायो-बबल भंग केल्याचा आरोप (Watch Video)

इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत व्हाईट-वॉशनंतर श्रीलंकेचे दोन क्रिकेटपटू, निरोशन डिकवेला आणि कुसल मेंडिस, COVID-19 प्रोटोकॉलचा उल्लंघन करत डरहॅम येथे रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र सोशल मीडियावर उघडकीस आलेले आहे. श्रीलंकेच्या व्यवस्थापक मनुजा करीयापेरुमा यांनी ESPNcricinfo यांना सांगितले की, टीम मॅनेजमेंट सोमवारी या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

कुसल मेंडिस आणि निरोशन डिकवेला (Photo Credit: Twitter)

ENG vs SL 2021: इंग्लंडविरुद्ध (England) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत व्हाईट-वॉशनंतर श्रीलंकेचे (Sri Lanka) दोन क्रिकेटपटू, निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) आणि कुसल मेंडिस (Kusal Mendis), COVID-19 प्रोटोकॉलचा उल्लंघन करत डरहॅम येथे रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र सोशल मीडियावर उघडकीस आलेले आहे. कुसल परेराच्या नेतृत्त्वातील संघाने खराब कामगिरी केली ज्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत लंकन संघाला लज्जास्पद पराभावाला सामोरे जावे लागले. बायो-बबलच्या उल्लंघनाच्या संभाव्य प्रकरणात श्रीलंकेच्या व्यवस्थापक मनुजा करीयापेरुमा यांनी ESPNcricinfo यांना सांगितले की, टीम मॅनेजमेंट सोमवारी या प्रकरणाची चौकशी करणार आहे, परंतु प्रत्यक्षात हा भंग झाला आहे की नाही याची अद्याप पुष्टी करता झालेली नाही आहे. मेंडिस आणि डिकवेला इंग्लंडच्या रस्त्यावर धूम्रपान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. (ENG vs SL 2nd T20I: इंग्लडच्या Sam Curran ने केलेला असा भन्नाट रनआऊट आपण नक्कीच पहिला नसेल, पाहा हा जबरदस्त Video)

दरम्यान, मेंडीस आणि डिकवेला यांनी खरोखरच हा बायो-बबलच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास त्यांना बरेच दिवस क्वारंटाईन ठेवले लागतील आणि तीन सामन्यांच्या मालिकेच्या किमान पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध होणार नाहीत. खेळाडूंवरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना 2 आठवड्यांसाठी क्वारंटाईन ठेवले जाईल आणि ब्रिटन सरकारने दंड आकारला जाईल. दोषी आढळल्यास त्यांना श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडूनही अतिरिक्त शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. सर्व क्रिकेट बोर्डांनी जगभरात कोविड-19 चा धोका लक्षात घेता बायो-बबलमध्ये राहण्याऱ्या खेळाडूंसाठी कठोर प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्त्वे आत्मसात केली आहेत. तसेच यापूर्वी अनेक खेळाडूंना बबलचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि इतरांचा जीव धोक्यात घालण्यासाठी शिक्षा देण्यात आलेली आहे. 29 जुलै रोजी पहिल्या एकदिवसीय सामन्यासंघ डरहॅम (Durham) येथे आहे. आतापर्यंत असे समजले आहे की श्रीलंकेच्या खेळाडूंना कार्डिफमध्ये बाहेर जाण्याची परवानगी होती परंतु डोरहॅममध्ये कोविड- 19 रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे शहर मर्यादेबाहेर आहे.

रविवारी रात्री 11.30 वाजता चित्रीत झालेल्या या व्हिडिओमध्ये कुसल मेंडिसने मास्क घातले नसून त्याच्या हातात सिगारेट दिसत आहे. त्याच्यासमवेत निरोशन डिकवेला हा दुसरा क्रिकेटर होता. दुसरीकडे, इंग्लंड विरुद्ध श्रीलंका मालिकेच्या तिसर्‍या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील आयसीसीचे मॅच रेफरी फिल व्हिटिकॅस यांची कोविड-19 टेस्ट देखील सकारात्मक आढळली आहे. दोन्ही संघांच्या कोणत्याही खेळाडूंनी सकारात्मक चाचणी आली नसली तरी यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) पहिल्या वनडे सामन्यांच्या संपूर्ण अधिकाऱ्यांना बदलण्यास भाग पाडले आहे, कारण त्यापैकी अनेक जण एकमेकांच्या संपर्कात आले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now