ENG vs PAK T20 2020: पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेसाठी इंग्लंड टीममध्ये टेस्ट संघातील एकाही खेळाडूचा समावेश नाही; डेविड मालन व क्रिस जॉर्डनचं पुनरागमन
आशियाई संघाविरूद्ध सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत संघातील सर्व खेळाडूंना निवड समितीने टी-20 मालिकेसाठी वगळले. इंग्लंडच्या टी-20 संघात डेविड मालन आणि अष्टपैलू क्रिस जॉर्डनचा समावेश करण्यात आला आहे.
पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) आगामी तीन सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने (England) 14 सदस्यीय टी-20 संघ जाहीर केला आहे. आशियाई संघाविरूद्ध सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत संघातील सर्व खेळाडूंना निवड समितीने टी-20 मालिकेसाठी वगळले. मॅनचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे तीनही सामने बंद दारा मागे खेळले जाणार आहेत, तर इयन मॉर्गन (Eoin Morgan) संघाचा कर्णधार असेल. साउथॅम्प्टन येथील अंतिम कसोटी मालिकेच्या तीन दिवसानंतर 28 ऑगस्ट रोजी टी-20 मालिकेचा पहिला सामना खेळला जाईल. इंग्लंड बोर्डाला प्रत्येक मालिकेसाठी मजबूत टीम निवडायची असताना मल्टी-फॉरमॅट खेळाडूंना विश्रांती आणि रीफ्रेश करण्याची काही संधी द्यायची असल्याने त्यांनी टेस्ट संघातील एकही खेळाडूची या मालिकेसाठी निवड केली नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) टी-20 मालिकेसाठी सहाय्यक प्रशिक्षक ग्रॅहम थॉर्पे हे मुख्य प्रशिक्षकाची भूमिका निभावत याची पुष्टी केली. मॅनचेस्टर येथे पहिली कसोटी जिंकल्यानंतर इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे, तर साऊथॅम्प्टन येथील दुसऱ्या सामन्यात पावसाने बाजी मारली आणि सामना अनिर्णित राहिला. (ENG vs PAK 2nd Test: इंग्लंड-पाकिस्तान साऊथॅम्प्टन टेस्ट अनिर्णित, इंग्लंडची मालिकेत 1-0 ने आघाडी)
इंग्लंडच्या टी-20 संघात डेविड मालन आणि अष्टपैलू क्रिस जॉर्डनचा समावेश करण्यात आला आहे. “या गर्दीच्या भरलेल्या आंतरराष्ट्रीय उन्हाळ्यात पाकिस्तान कसोटी सामन्याच्या जैव-सुरक्षित बबलमध्ये असलेल्या खेळाडूंचा या संघात समावेश नाही,” असे राष्ट्रीय निवडकर्ता एड स्मिथ यांनी एका निवेदनात म्हटले. “आम्हाला प्रत्येक मालिकेसाठी मजबूत पथक निवडताना मल्टी-फॉरमॅट खेळाडूंना विश्रांती आणि रीफ्रेश करण्याची काही संधी द्यायची आहे.” इंग्लंड-पाकिस्तानमधील दुसऱ्या टेस्ट सामन्यात पावसामुळे पाच दिवसात फक्त 134.3 ओव्हरचा खेळ झाला. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पावसाने कहर केला, पाचव्या दिवशी थोडा दिलासा मिळाला पण 110/4 धावसंख्येवर डाव घोषित केला.
इंग्लंड टी -20 संघः इयन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), टॉम बॅंटन, सॅम बिलिंग्ज, टॉम कुरन, जो डेन्ली, लुईस ग्रेगरी, क्रिस जॉर्डन, साकीब महमूद, दाविद मालन, आदिल रशीद, जेसन रॉय, डेविड विळी.