ENG vs PAK T20 2020: इंग्लंडविरुद्ध पाकिस्तान टी-20 टीम घोषित; नसीम शाह, हैदर अली यांना संधी, माजी कर्णधार सरफराज अहमदचे पुनरागमन
इंग्लंडविरुद्ध 28 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तान संघ जाहीर झाला आहे. युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहला इंग्लंडविरुद्ध 28 ऑगस्टपासून सुरू होणार्या आंतरराष्ट्रीय तीन टी-20 सामन्यात व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. नसीमशिवाय पाकिस्तानने 19 वर्षीय फलंदाज हैदर अलीचा देखील समावेश केला आहे.
पाकिस्तान संघ (Pakistan Team) सध्या तीन टेस्ट आणि तीन सामन्याच्या टी-20 मालिकेसाठी इंग्लंड (England) दौर्यावर आहे. यजमान इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचे पाकिस्तान संघाचे स्वप्न आधीच तुटलेले आहे आणि आता 28 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेकडे टीमचे लक्ष आहे, यासाठी पाकिस्तान संघ जाहीर झाला आहे. या संघात युवा खेळाडू तसेच अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहला (Naseem Shah) इंग्लंडविरुद्ध 28 ऑगस्टपासून सुरू होणार्या आंतरराष्ट्रीय तीन टी-20 सामन्यात व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. पाकिस्तानच्या 17 सदस्यीय संघात नसीमचा समावेश होता. 17 वर्षीय गोलंदाजने आजवर सहा कसोटी सामने खेळले आहेत परंतु अद्याप त्याने पाकिस्तानकडून मर्यादित ओव्हरचा सामना खेळलेला नाही. नसीमशिवाय पाकिस्तानने 19 वर्षीय फलंदाज हैदर अलीचा (Haider Ali) देखील समावेश केला आहे. (ENG vs PAK 3rd Test Day 1: झॅक क्रॉलीच्या दमदार डावाने इंग्लंडची आघाडी, जोस बटलर सोबत केली 200 हुन अधिकची भागीदारी)
हैदर अलीने अंडर-19 क्रिकेट, प्रथम श्रेणी क्रिकेट आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. बाबर आझम संघाचे नेतृत्व करणार आहेत. माजी कर्णधार आणि विकेटकीपर-फलंदाज सरफराज अहमदलाही (Sarfaraz Ahmed) संघात स्थान मिळाले आहेत. मोहम्मद आमिर, वहाब रियाज आणि फखर जमान यांचेही संघात पुनरागमन झाले. 12 ऑगस्ट रोजी इंग्लंडमध्ये दाखल झालेला अष्टपैलू शोएब मलिकलाही संघात स्थान देण्यात आले आहे आणि कॉरोन व्हायरस टेस्ट क्लिअर केल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांमध्ये सामील होईल. सर्व तीन टी-20 सामने मॅचचेस्टरमध्ये 28, 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार आहेत. दरम्यान, इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचे पाकिस्तान संघाचे स्वप्न भंग झाले. पहिला सामना पाकिस्तानने गमावला तर दुसरा सामना पावसामुळे ड्रॉ झाला. अशा परिस्थितीत इंग्लंडला कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे.
पाकिस्तान की टी20 टीम: बाबर आजम (कॅप्टन), फखर जमन, हैदर अली, हॅरिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, खुशिल शाह, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान, मोहम्मद आमिर, नसीम शाह, सरफराज अहमद, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, शोएब मलिक आणि वहाब रियाज.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)