ENG vs PAK 1st Test: पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदने 12 व खेळाडू म्हणून उचलले बूट; विराट कोहली, एमएस धोनीशी तुलना करत यूजर्सकडून कौतुक

आणि सरफराज अहमद एक वेगळ्या कारणामुळे ट्रेंड होत आहे आणि ते म्हणजे कसोटीच्या दुसर्‍या दिवशी फलंदाजांसाठी शूज घेऊन जाताना दिसला. बर्‍याच लोकांनी त्याचे कौतुक केले आणि विराट कोहली, डॉन ब्रॅडमन यांच्यासारख्या दिग्गजांशी तुलना केली.

सरफराज अहमदने 12 व खेळाडू म्हणून उचलले बूट (Photo Credit: Twitter)

श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिका गमावल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सरफराज अहमदला (Sarfaraz Ahmed) सर्व फॉर्ममध्ये कर्णधारपदावरून काढून टाकले. शिवाय, त्याच्या खराब फॉर्ममुळे त्यालाही संघातून वगळण्यात आलं आणि बर्‍याच जणांचा विचार केला की तो पुन्हा संघात परत येईल का? तथापि, सरफराज कसोटी संघात परतला, तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला (England) पोहचला. दुर्दैवाने त्याची कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले नाही. ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) विकेटकीपर म्हणून निवडण्यात आले. पण, सध्या सरफराज सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे आणि त्यामागील कारण म्हणजे कसोटीच्या दुसर्‍या दिवशी फलंदाजांसाठी शूज घेऊन जाताना दिसला. पाकिस्तानच्या (Pakistan) डावातील 71व्या षटकात ही घटना घडली जेव्हा रिझर्व्ह खेळाडू सरफराज आपल्या सहकाऱ्यांसाठी खेळपट्टीवर शूज घेऊन आला. (ENG vs PAK 1st Test: बाबर आझमने जडले शानदार अर्धशतक; विराट कोहली असता तर सर्वांनी केली असती चर्चा म्हणत नासिर हुसैन यांनी दिली प्रतिक्रिया)

सरफराजचे फोटो लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चाहत्यांना त्याच्याबद्दल वाईट वाटले व ते सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. तथापि, बर्‍याच लोकांनी त्याचे कौतुक केले आणि विराट कोहली, डॉन ब्रॅडमन यांच्यासारख्या दिग्गजांशी तुलना केली जे खेळत नसताना आपल्या टीमच्या साथीदारांसाठी ड्रिंक्स घेऊन आले. सरफराजच्या या कृतीवर ट्विटर यूजर्सच्या प्रतिक्रिया पाहा:

सरफराज अहमद ड्रिंक सर्व्ह केले 

आमचा कप्तान

डॉन ब्रॅडमन

'पाणी बॉय'

कोणताही खेळाडू ड्रिंक्स नेण्यासाठी खूप मोठा किंवा महत्वाचा नाही.

विराट कोहली किंवा विल्यमसन

आणि कोहलीचे काय

क्रिकेटमधील काही मोठ्या नावांनी हे केले आहे

दरम्यान, संघात पुनरागमन केल्यामुळे सरफराज आता संघात त्याच्या टीममध्ये शिक्कामोर्तब करण्यासाठी संधीची वाट पाहणार आहे. त्याच्या जागी खेळवण्यात आलेला मोहम्मद रिझवानने विकेटच्या मागे चांगली कामगिरी केली पण फलंदाजी म्हणून अद्याप त्याला छाप पाडता आली नाही. कर्णधार म्हणून सरफराजच्या नेतृत्वात पाकिस्तानने इंग्लंडमध्ये 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपद जिंकले. परंतु टीमला मागील वर्षीच्या विश्वचषक उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवण्यात सरफराजच्या अपयशामुळे त्याला ऑक्टोबरमध्ये तीनही फॉर्मेटचा कर्णधार म्हणून काढून टाकण्यात आले.