ENG vs NZ Test 2021: इंग्लंडचा James Anderson विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर, अनिल कुंबळेचा रेकॉर्ड मोडण्यापासून फक्त 6 पावले दूर

किवी टीम विरोधात सामन्यात पुन्हा एकदा सर्वांची नजर इंग्लिश संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याच्यावर असेल. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत अँडरसनच्या निशाण्यावर भारताचा दिग्गज अनिल कुंबळेचा रेकॉर्ड असेल. कुंबळेने 132 सामन्यात 619 विकेट्स घेतल्या आहेत.

जेम्स अँडरसन (Photo Credit: Getty Images)

ENG vs NZ Test 2021: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यापूर्वी यजमान इंग्लंड (England) आणि किवी संघात 2 जूनपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. पहिला सामना प्रख्यात लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर (Lords Cricket Ground) खेळला जाईल. फेब्रुवारी-मार्च महिन्यानंतर पहिल्यांदा इंग्लिश टीम कसोटी क्रिकेटसाठी मैदानात उतरेल. किवी टीम विरोधात सामन्यात पुन्हा एकदा सर्वांची नजर इंग्लिश संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याच्यावर असेल. अँडरसनने आतापर्यंत 160 कसोटी सामन्यांमध्ये 614 विकेट्स घेतल्या असून हा टप्पा गाठणारा तो जगातील एकमेव वेगवान गोलंदाज आहे. आता न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत अँडरसनच्या निशाण्यावर भारताचा दिग्गज अनिल कुंबळेचा (Anil Kumble) रेकॉर्ड असेल. कुंबळेने 132 सामन्यात 619 विकेट्स घेतल्या आहेत. (ENG vs NZ Test 2021: इंग्लंडने 15 सदस्यीय संघाची केली घोषणा; IPL खेळाडूंना विश्रांती तर 2 युवा क्रिकेटपटूंचा केला समावेश)

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात तो इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतो, त्यामुळे कुंबळेचा विक्रम मोडणे त्याला फारसे अवघड जाणार नाही. शिवाय, अँडरसनच्या रडारवर आणखी एक रेकॉर्ड असेल. जिमी अँडरसन 2 जूनपासून होणाऱ्या पहिला लॉर्ड्स कसोटी सामना खेळला तर तो इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकच्या 161 कसोटी सामने खेळण्याच्या विक्रमाची बरोबरी करेल. इंग्लिश संघासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा रेकॉर्ड कूकच्या नावावर आहे आणि लॉर्ड्स कसोटी सामना खेळण्यास अँडरसन त्याची बरोबरी करत एजबॅस्टन दुसऱ्या टेस्ट सामन्यात तो यादीत आघाडीवर जाईल. दुसरीकडे, अँडरसन आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1000 विकेट्स पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्याने 259 सामन्यात 992 विकेट्स घेतल्या असून इंग्लंडचा माजी गोलंदाज अ‍ॅन्ड्र्यू कॅडिक 2005 मध्ये हा टप्पा गाठणारा इंग्लंडचा अखेरचा खेळाडू होता.

इंग्लंडचा माजी डावखुरा फिरकीपटू विल्फ्रेड रोड्सने सर्वाधिक 4,204 प्रथम श्रेणी विकेट्सचा विक्रम नोंदवला आहे. अँडरसनने 18 वर्षांच्या दीर्घ कसोटी कारकीर्दीत लॉर्ड्स येथे 23 कसोटी सामने खेळले आहेत. ऐतिहासिक मैदानावर त्याने सहा वेळा पाच विकेट्स घेत 23.89 च्या सरासरीने 103 विकेट्स घेतल्या आहेत. अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे दोन अनुभवी व संघाचे आघाडीचे वेगवान गोलंदाज आहेत आणि अलीकडच्या काळात दोघे बोर्डाच्या रोटेशन धोरणामुळे कसोटी एकत्र खेळले नाही आहेत.