ENG vs NZ ICC CWC 2019 Final: विश्वचषक फायनलची सुपर ओव्हरही टाय तरी इंग्लंड बनला जगज्जेता, पहा हे नियम

लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कामगिरी करत इंग्लंड संघाने पहिल्यांदा आयसीसी क्रिकेट विश्वचषक चे जेतेपद मिळवले आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सुपर-ओव्हर देखील टाय झाली मात्र, इंग्लंड संघ सर्वाधिक बाऊंड्रीजच्या आधारावर विजयी झाला.

इंग्लंड संघ (Photo Credits: Getty Images)

लॉर्ड्स (Lords) मैदानावर ऐतिहासिक कामगिरी करत इंग्लंड संघाने पहिल्यांदा आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक चे जेतेपद मिळवले आहे. इंग्लंडने सुपर-ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला. इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांचा सामना टाय झाला. दोन्ही संघांनी निर्धारीत ओव्हरमध्ये 241 धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर दोन धावा हव्या असताना बेन स्टोक्स याला एकच धाव काढता आली. सुपर-ओव्हर देखील टाय झाली मात्र, इंग्लंड संघ सर्वाधिक बाऊंड्रीजच्या आधारावर विजयी झाला. आयसीसी नियमानुसार अधिक धावा करणाऱ्या संघाला विजेतापद देण्यात येते. सुपर-ओव्हरमध्ये इंग्लंडने पहिले फलंदाजी करत 15 धावा केल्या. आजवर पहिले तर वनडे सामन्यात पहिल्यांदा सुपर ओवर खेळली गेली. (ENG vs NZ ICC CWC 2019 Final: इंग्लंडची ऐतिहासीक कामगिरी, न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करत पहिल्यांदा जिंकले विश्वचषक जेतेपद)

पाहूया सुपर ओव्हरशी निगडीत हे नियम:

  • जर विश्वचषक फाइनल सामना टाय झाला तर सुपर ओवरने विजेता ठरवणे बंधनकारक असेल

  • प्लेयिंग इलेव्हनमध्ये खेळलेले खेळाडूच सुपर ओव्हरमध्ये (बॅटिंग व बॉलिंग) सहभागी होतील.

  • दुसऱ्यानंद फलंदाजी करणार संघ सुपर ओव्हरमध्ये पहिले बॅटिंग करायला उतरणार

  • क्षेत्ररक्षण करणारा संघ गोलंदाजीसाठी बाजूची निवड करेल

  • जर सुपर ओव्हर देखील टाय झाली तर सामन्यांमधील सर्वाधिक बाउंड्रीच्या आधारावर विजेत्याची निवड केली जाईल.

म्हणून या नियमांच्या आधारावर इंग्लंड संघाने 2019 मधील विश्वचषक जिंकला.

दरम्यान, इंग्लंडच्या इंनिंग्समध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना विजयासाठी 15धावांची गरज होती. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या दोन बॉलला स्टोक्सला एकही रन काढता आली नाही. यानंतर स्टोक्सने ट्रेन्ट बोल्ट च्या तिसऱ्या बॉलवर सिक्स मारली. चौथ्या बॉलला दोन रन काढल्यानंतर मार्टिन गप्टील याने केलेला थ्रो स्टोक्सच्या लागून सेमारेषेला लागला आणि अंपायर ने चौकार दिले. या एका चेंडूने सगळं खेळ बदलून टाकला. यामुळे इंग्लंडला ६ धावा मिळाल्या. पाचव्या बॉलला दुसरी रन काढताना आदिल रशीद धाव बाद झाला. यानंतर शेवटच्या बॉलवर इंग्लंडला विजयासाठी 2 धावांची गरज होती. तेव्हा दुसरी रन काढताना मार्क वूड (Mark Wood) ही रन आऊट झाला.

यंदाच्या विश्वचशकच्या एका बॅटची निर्णायक भूमिका ठरली. अखेरच्या षटकापर्यंत विश्वचषकाची अंतिम फेरी रंगली. विश्वचषक विजेता कोण होणार, हे कुणीही सांगू शकत नव्हते. अटीतटीच्या झालेला हा सामना अखेर सुपर ओव्हरमध्ये गेला. फलंदाजांनी चांगल्या भागीदारी न केल्याचा फटका न्यूझीलंडला अंतिम फेरीत बसला. न्यूझीलंकडून मोठ्या भागीदाऱ्या होऊ शकल्या नाहीत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now