ICC World Cup 2019 Final: विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला मिळणार पुरस्कार म्हणून इतके पैसे, टीम इंडिया ला सेमीफायनलसाठी मिळणार इतकी Prize Money
जिंकणाऱ्या टीमला आयसीसीकडून 40 लाख डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात तब्बल 27 कोटी 46 लाख 50 हजार रुपये मिळणार आहेत.
आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकचा अंतिम सामना इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात लॉर्ड्स (Lords) मैदानावर सुरु आहे. इंग्लंड-न्यूझीलंड संघाने याआधी एकदाही विश्वचषक जिंकले नाही त्यामुळे आजच्या सामन्यात विजयी संघाच्या रूपात क्रिकेटविश्वाला एक नवा विश्वविजेता मिळणार आहे. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत न्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी 240 धावांचे लक्ष दिले आहे. आजचा विश्वचषक जिंकलेल्या संघावर आयसीसीकडून पैशाचा वर्षाव वर्षाव केला जाईल. जिंकणाऱ्या टीमला आयसीसीकडून 40 लाख डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात तब्बल 27 कोटी 46 लाख 50 हजार रुपये मिळणार आहेत. (British ग्रँड प्रिक्स, विंबलडन 2019 की आयसीसी विश्वचषक काय पाहावे, ब्रिटनच्या चाहत्यांमध्ये गोंधळ, पहा Tweets)
दुसरीकडे, उपविजेत्या संघाला 20 लाख डॉलर एकवढी रक्कम दिली जाईल. तर सेमीफाइनलमध्ये पोहचलेल्या संघाना, भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia), यांना 8 लाख डॉलर म्हणजे 5 कोटी 49 लाख 30 रुपये दिले जातील. विश्वचषकच्या साखळी सामन्यात टीम इंडियाने 7 मॅच जिंकल्या होत्या आणि या प्रत्येक विजयासाठी 27 लाख 46 हजार 500 रुपये मिळणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धची मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली त्यामुळे या मॅचसाठी भारतीय संघाला 13 लाख, 73 हजार 250 रुपये मिळतील.
दरम्यान, साखळी फेरीनंतर न्यूझीलंड गुणतक्त्यात चौथ्या तर इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर होता. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा आणि इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.