ENG vs AUS ODI 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर; जेसन रॉय IN, डेविड मालन राखीव खेळाडू
मॅन्चेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडने 14 खेळाडूंची टीम जाहीर केली आहे. दुखापतीमुळे टी-20 मालिकेत न खेळू शकलेला सलामी फलंदाज जेसन रॉय परतला आहे. 14 सदस्यीय संघ वगळता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी राखीव खेळाडू म्हणून डेविड मालनसह तीन खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.
इंग्लंडविरूद्ध (England) शेवटच्या टी-20 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) अंतिम षटकात शानदार विजय मिळवला. इंग्लंडने दिलेल्या 146 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 5 विकेट आणि 3 चेंडू राखून मिळवला. मिशेल मार्शने (Mitchell Marsh) ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियावरील व्हाईटवॉशची नामुष्की अष्टपैलू मार्शने वाचवली आणि संघाला विजय मिळवून दिला, पण मालिका मात्र इंग्लंडने 2-1 ने जिंकली. टी-20 मालिकेनंतर आता सर्वांचे लक्ष लागून असेल ते शुक्रवार, 11 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेवर. मॅन्चेस्टर (Manchester) येथील ओल्ड ट्रॅफर्डवर (Old Trafford) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विश्वविजेता इंग्लंड आणि इंग्लंड टीममध्ये लढत पाहायला मिळेल. यासाठी इंग्लंडने 14 खेळाडूंची टीम जाहीर केली आहे. इयन मॉर्गन (Eoin Morgan) टीमचे नेतृत्व करेल, तर दुखापतीमुळे टी-20 मालिकेत न खेळू शकलेला सलामी फलंदाज जेसन रॉय (Jason Roy) परतला आहे. रॉयला पाकिस्तान आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धटी-20 मालिकेला मुकावे लागले होते. (ICC T20I Rankings: बाबर आझमला मागे टाकत डेविड मलान अव्वल स्थानी विराजमान, टॉप-10 फलंदाजांमध्ये दोन भारतीय)
जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो इंग्लंडकडून वनडे क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करतात. अशा स्थितीत दोन सलामी फलंदाज असताना टी-20 मालिकेप्रमाणे वनडेमध्ये देखील बटलरला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. एकदिवसीय मालिकेसाठी 14 सदस्यीय संघ वगळता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी राखीव खेळाडू म्हणून डेविड मालनसह तीन खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. इंग्लंडकडून टी -20 क्रिकेटमध्ये मालनने चमकदार कामगिरी केली आणि आयसीसी टी-20 क्रमवारीत पहिले स्थान मिळवले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. मालिकेचा दुसरा सामना 13 सप्टेंबरला तर तिसरा आणि अंतिम सामना 16 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. वनडे मालिकेचे सर्व सामने मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड ग्राऊंडवर खेळले जातील.
इंग्लंड संघ: इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, टॉम बंटन, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, जेसन रॉय, सॅम कुरन, टॉम कुरन, आदिल रशीद, जो रूट, क्रिस वोक्स आणि मार्क वुड.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)