ENG vs AUS 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडचा टी-20 आणि वनडे संघ जाहीर, जोफ्रा आर्चर, जोस बटलर परतले, जो रूट टी-20 संघातून आऊट

त्यासाठी एक अतिशय मजबूत यजमान टीम जाहीर करण्यात आली आहे. इंग्लंडने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, मार्क वुड आणि यष्टीरक्षक जोस बटलरला वनडे आणि टी-20 संघात संधी दिली आहे.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वनडे (Photo Credit: Twitter/ICC)

पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेचा अंतिम सामना आज मॅन्चेस्टर येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर शुक्रवार, 4 सप्टेंबरपासून यजमान इंग्लंड (England) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) टी-20 आणि वनडे मालिका खेळेल. त्यासाठी एक अतिशय मजबूत यजमान टीम जाहीर करण्यात आली आहे. इंग्लंडने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer), मार्क वुड आणि यष्टीरक्षक जोस बटलरला (Jos Buttler) वनडे आणि टी-20 संघात संधी दिली आहे. शिवाय, कसोटी कर्णधार जो रूट वनडे संघात परतला आहे. हे खेळाडू कोरोना व्हायरसनंतर केवळ कसोटी सामने खेळत होते परंतु त्यांना ऑस्ट्रेलियासारख्या मजबूत प्रतिस्पर्ध्याविरुद्ध परत बोलावण्यात आले आहे. इयन मॉर्गनच्या (Eoin Morgan) नेतृत्वात दोन्ही संघात वेगवान गोलंदाज सॅम कुर्रानलाही (Sam Curran) स्थान देण्यात आले आहे. वडील कर्करोगाशी झुंज देत असल्याने अष्टपैलू बेन स्टोक्स या मालिकेत खेळणार नाहीत. स्टोक्सने यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध मालिकेतून देखील माघार घेतली होती. (ENG vs AUS 2020: सप्टेंबर महिन्यात होणार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वनडे आणि टी-20 मालिका; ऑस्ट्रेलियाच्या 21 सदस्यीय संघाची घोषणा, जाणून घ्या पूर्ण शेड्युल)

इंग्लंडने पहिल्यांदाच असा मजबूत संघ निवडला आहे. वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानविरुद्ध त्यांनी आपल्या युवा खेळाडूंना संधी दिली आहे, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी मजबूत संघ निवडला. इंग्लंड क्रिकेट संघाचे निवडकर्ता एड स्मिथ म्हणाले, "आम्हाला आपल्याला मजबूत संघ मैदानात घ्यायचा आहे. विजयासह समर संपविण्याची ही चांगली संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केल्याने सर्वांना आनंद होईल."

दरम्यान, इंग्लंडचा सलामी फलंदाज जेसन रॉय संघाबरोबर सध्या बायो सिक्योर बबलमध्ये आहे. रॉयला स्नायू ताण समस्या जाणवली ज्यामुळे पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेतून देखील तो बाहेरच राहील. तथापि, वनडे मालिकेपर्यंत तंदुरुस्त झाल्यास तो संघात परतू शकतो. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका 4 सप्टेंबरपासून सुरू होईल. त्यानंतर 11 सप्टेंबरपासून तीन वनडे सामन्यांची मालिका खेळले जाईल.

इंग्लंड टी-20 टीम: इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, टॉम बंटन, जोस बटलर, सॅम कुर्रान, टॉम कुर्रान, जो डेन्ली, क्रिस जोर्डन, डेविड मलान, मार्क वुड आणि आदिल राशिद.

इंग्लंड वनडे टीम: इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, टॉम बंटन, जोस बटलर, जो रूट, क्रिस वोक्स, मार्क वुड, सॅम कुर्रान, टॉम कुर्रान आणि आदिल राशिद.